
🌟 प्रविण डाकरे सर
🏫 विद्या मंदिर वेंगरूळ,
ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
📞 संपर्क क्र. ९४२३३०९२१४
📘 समग्र प्रगतीपत्रक (HPC) नोंदी
C-1.1 पोषक आहाराबाबत रुची आणि समज दर्शवतो व अन्नपदार्थ वाया घालवत नाही.
C-1.2 स्वतःची मुलभूत काळजी आणि स्वच्छतेबाबत सतर्क राहतो.
C-1.3 वर्ग/शाळा स्वच्छ आणि नीटनेटके ठेवतो.
C-1.4 वस्तू आणि सोप्या साधनांचा सुरक्षितपणे वापर करतो.
C-1.5 हालचालींमध्ये सजगता दाखवतो आणि योग्य रीतीने वागतो (चालणे, धावणे, सायकल चालविणे).
C-1.6 असुरक्षित/धोकादायक परिस्थिती समजतो आणि मदत मागतो.
C-2.1 आकार, रंग आणि त्यांच्या छटा यांच्यामधील फरक ओळखतो.
C-2.2 चिन्हे आणि प्रतीके यांकरिता दृक्-स्मृती (Visual Memory) विकसित करतो.
C-2.3 ध्वनी आणि ध्वनीची रचना यांत पट्टी, आवाज व गती या आधारे फरक करतो.
C-2.4 वेगवेगळे गंध आणि चव यांतील फरक ओळखतो.
C-2.5 विविध प्रकारच्या स्पर्शामधील फरक करण्याची क्षमता विकसित होते.
C-2.6 अनुभवांची सर्वंकष जाणीव होण्यासाठी ज्ञानेंद्रियामार्फत मिळालेल्या संवेदनांचे एकात्मिकरण करण्यास सुरुवात करतो.
C-3.1 विशिष्ट कृती करताना ज्ञानेंद्रियांच्या संवेदना व शारीरिक हालचाली यांत समन्वय दर्शवितो.
C-3.2 विविध शारीरिक कृतींमध्ये तोल, समन्वय आणि लवचीकता दर्शवतो.
C-3.3 हाताने कृती करताना हात व बोटे यांच्या हालचालींमध्ये अचूकता आणि नियंत्रण दर्शवितो.
C-3.4 एखादी वस्तू वाहून नेताना, चालताना, पळताना ताकद व चिकाटी दाखवितो.
C-4.1 कुटुंब आणि समाजाचा एक घटक या नात्याने, स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वतःला ओळखायला सुरुवात करतो.
C-4.2 विविध भावना ओळखतो व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो.
C-4.3 इतर बालके आणि प्रौढ यांच्याशी सहजतेने संवाद साधतो.
C-4.4 इतर बालकांबरोबर सहकार्य वृत्तीने वागतो.
C-4.5 शाळेत आणि वर्गात सामाजिक नियम समजून घेऊन, त्याप्रमाणे सकारात्मक वर्तन करतो.
C-4.6 गरजेच्या वेळी इतरांना (प्राणी आणि वनस्पतींसह) मदत करतो आणि दयाभाव दर्शवितो.
C-4.7 इतर बालकांचे विचार, त्यांचे प्राधान्य व भावनिक गरजा लक्षात घेऊन त्यांना सकारात्मक प्रतिसाद देतो.
C-7.1 वेगवेगळ्या गटांतील वस्तूंमधील फरक व वस्तूंचा एकमेकाशी संबंध यांचे निरीक्षण करतो व समजून घेतो.
C-7.2 निसर्गाच्या निरीक्षणातून कार्यकारणभाव समजून घेऊन, तो दर्शविणारी साधी परिकल्पना मांडतो व त्याच्या स्पष्टीकरणाकरिता निरीक्षणाचा आधार घेतो.
C-7.3 दैनंदिन जीवनातील परिस्थितीमध्ये व अध्ययन करण्यासाठी, सुयोग्य साधने व तंत्रज्ञान वापरतो.
C-8.1 एकापेक्षा जास्त गुणधर्मांच्या आधारे वस्तू गटात आणि उपगटात वेगळ्या करतो.
C-8.2 आपल्या परिसरातील आकार आणि संख्या यांच्या आधारे साधे आकृतिबंध ओळखतो आणि त्यांचा विस्तार करतो.
C-8.3 १० आणि २० या टप्प्याने ९९ पर्यंतच्या संख्या पुढे आणि मागे दोन्ही प्रकारे मोजतो.
C-8.4 चढत्या आणि उतरत्या क्रमाने ९९ पर्यंतच्या संख्यांची मांडणी करतो.
C-8.5 स्थानिक किमतीचा वापर करून ९९ पर्यंतच्या संख्या दर्शविण्यासाठी संख्याचिन्हांचा वापर करतो आणि संख्या ओळखतो.
C-8.6 संख्यांची जोड (composition) व फोड (decomposition) आणि गट करणे या कार्यनीतींचा वापर करून दोन अंकी संख्यांची बेरीज व वजाबाकी करतो.
C-8.7 गुणाकार म्हणजे पुन्हा-पुन्हा बेरीज आणि भागाकार म्हणजे समान वाटणी हे समजतो.
C-8.8 मूलभूत भौमितिक आकार ओळखतो, तयार करतो, वर्गीकरण करतो आणि त्याबद्दल समजावून सांगतो.
C-8.9 लगतच्या परिसरातील वस्तूंची लांबी, वजन आणि आकारमानासाठी साधी मोजमापे करतो.
C-8.10 मिनिटे, तास, दिवस, आठवडे आणि महिने यामध्ये साधी मोजमापे करतो.
C-8.11 १०० रुपयांपर्यंतचे साधे व्यवहार करतो.
C-8.12 राशी, आकार, अवकाश आणि मोजमापे या संकल्पनांचे आकलन होण्यासाठी आणि संकल्पना व्यक्त करण्यासाठी सुयोग्य व पुरेशी शब्दसंपत्ती विकसित करतो.
C-8.13 राशी, आकार, अवकाश आणि मोजमापे या संदर्भात सोपी गणिते सोडवतो व स्वतः तयार करतो.
C-9.1 साधी गाणी, बडबडगीते आणि कविता ऐकतो आणि त्याबद्दल आवड व्यक्त करतो.
C-9.2 स्वतःहून साधी गाणी आणि कविता तयार करतो.
C-9.3 अर्थपूर्ण व अस्खलितपणे संभाषण करतो.
C-9.4 क्लिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी मौखिक सूचना समजून घेतो व इतरांना त्याच कार्यासाठी स्पष्ट मौखिक सूचना देतो.
C-9.5 कथन केलेल्या/वाचलेल्या गोष्टी समजून घेतो आणि त्यातील पात्रे, गोष्टीची मध्यवर्ती कल्पना व लेखकाचा संदेश लक्षात घेतो.
C-9.6 स्पष्ट कथानकासह लघुकथा आणि पात्रांचे कथन करतो.
C-9.7 दैनंदिन संवादासाठी पुरेसा शब्दसंग्रह आत्मसात करतो व त्या आधारे नवीन शब्दांचा अर्थ लावतो.
C-10.1 शब्दध्वनींची जाणीव होऊन शब्दध्वनी/अक्षरे शब्दात गुंफतो व शब्दातून वेगळी करतो.
C-10.2 पुस्तकाची रचना, मुद्रित अक्षरे, मजकुराची दिशा व प्राथमिक विरामचिन्हे ओळखतो.
C-10.3 भाषा एकच्या लिपीतील सर्व अक्षरे व अवयव ओळखतो आणि त्या ज्ञानाचा वापर करून शब्द वाचन-लेखन करतो.
C-10.4 भाषा एकमधील कथा व परिच्छेद योग्य ठिकाणी विराम घेऊन, आवाजातील चढ-उतारांसह अचूक व ओघवतेपणाने वाचतो.
C-10.5 स्वतःहून पात्रांची ओळख, कथाबीज व लेखकाचा संदेश समजून कथा वाचतो व त्याचा अर्थ समजून घेतो.
C-10.6 छोट्या कविता वाचतो आणि त्यातील शब्दनिवड व कल्पनांची प्रशंसा करतो.
C-10.7 छोट्या बातम्या, सूचना, पाककृती आणि प्रकाशित साहित्य वाचतो व त्यातील अर्थ समजून घेतो.
C-10.8 स्वतःला समजलेल्या गोष्टी सांगण्यासाठी व स्वतःचे अनुभव व्यक्त करण्यासाठी परिच्छेद लेखन करतो.
C-10.9 बालकांसाठी असलेली विविध पुस्तके वाचण्यात रुची दर्शवितो.
C-12.1 द्विमितीय (2D) व त्रिमितीय (3D) कलाकृती तयार करण्यासाठी विविध साहित्य व साधने हाताळतो आणि त्याबरोबर खेळतो.
C-12.2 संगीत, भूमिकाभिनय, नृत्य आणि हालचालींसाठी स्वतःचा आवाज, शरीर, जागा व विविध वस्तूंचा शोध घेतो आणि त्यांचा वापर करतो.
C-12.3 कलेच्या माध्यमातून स्वतःच्या कल्पना व भावना सर्जनशीलतेने व्यक्त करतो.
C-12.4 कला माध्यमामध्ये इतरांसोबत सहयोगाने काम करतो.
C-12.5 विविध कला, स्थानिक संस्कृती व वारसा अनुभवताना त्यावर प्रतिक्रिया देतो आणि त्यांची प्रशंसा करतो.
C-13.1 विशिष्ट ध्येय प्राप्तीसाठी नियोजन, अवधान केंद्रीकरण व मार्गदर्शित कृती करतो.
C-13.2 स्मृती, मानसिक लवचिकता व स्व-नियंत्रण विकसित करून अध्ययन सुलभ करतो.
C-13.3 वस्तूंचे सूक्ष्म निरीक्षण करतो, ज्ञानेंद्रियांचा वापर करून शोध घेतो, आश्चर्य व्यक्त करतो व प्रश्न विचारतो.
C-13.4 वर्गखोलीतील नियम समजून घेतो, मनापासून स्वीकारतो आणि त्यांचे पालन करतो.