समूहगीत - रिमझिम रिमझिमरिमझिम रिमझिम रिमझिम रिमझिम
पडतो आहे पाऊस माझ्या लाडाचा,
खेळगडी हा बालपणीचा अंगणातल्या झाडाचा..
रिमझिम रिमझिम रिमझिम रिमझिम
पडतो आहे पाऊस माझ्या लाडाचा,
खेळगडी हा बालपणीचा अंगणातल्या झाडाचा..||धृ ||
कौलारावर ठेका धरुनी टपटप तबला वाजवितो(2)
वाऱ्यावरती असा झुले की झोपाळ्याला लाजवितो..(2)
रिमझिम रिमझिम रिमझिम रिमझिम
पडतो आहे पाऊस माझ्या लाडाचा,
खेळगडी हा बालपणीचा अंगणातल्या झाडाचा..
रिमझिम रिमझिम रिमझिम रिमझिम  || 1 ||
हिरव्या हिरव्या कुरणावरती नाचत पाऊल टाकत असे (2)
तळ्यात आपुले रूप पाहाया आभाळातून वाकत असे (2)
रिमझिम रिमझिम रिमझिम रिमझिम
पडतो आहे पाऊस माझ्या लाडाचा,
खेळगडी हा बालपणीचा अंगणातल्या झाडाचा..
रिमझिम रिमझिम रिमझिम रिमझिम  || 2 ||
मोरपिसापरी नाजूकशी सर गालावरुनी फिरवित असे (2)
मेघाच्या पालखीत बसुनी पाऊसराजा मिरवीत असे (2)
रिमझिम रिमझिम रिमझिम रिमझिम
पडतो आहे पाऊस माझ्या लाडाचा,
खेळगडी हा बालपणीचा अंगणातल्या झाडाचा..
रिमझिम रिमझिम रिमझिम रिमझिम  (2) || 3 ||


गीतकार- मंगेश पाडगावकर  संगीतकार - दत्तात्रय डोईफोडे  

   संगीतानं माणसाच्या मनाचा वेध घेता येतो.माणसाच्या जडणघडणीत गाण्याचा महत्वाचा वाटा असतो.लहानपणी होणारे संस्कार पुढे आयुष्यभर त्याला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असतात.       
      बालकांच्यामध्ये लहानपणापासुनच विविध संस्कारांचं बीजारोपण व्हावं; शाळांमध्ये बालसुलभ वातावरण तयार होऊन मुलं शाळेत रमावीत; बालकांना योग्य ती स्वरलिपी,योग्य तो आवाज, योग्य तो चढउतार यांचे मार्गदर्शन मिळावे याकरिता "महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तथा  विद्या परिषद पूणे " यांनी 15 निवडक गितांची रचना "गीतावली" या नावाने तयार केली आहे.     
      हे बनवताना या विद्यापरिषदेचे संचालक श्री. नामदेवराव जरग यांची प्रेरणा,  विद्या परिषदेच्या कलाकारांचे योगदान तसेच बालचित्रवाणी अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे..या सर्वांना साष्टांग दंडवत. प्रस्तुत गीतेे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न... 

समूहगीत - धोय धोय पाऊस 

समूहगीत - आनंदाचे गाणे

Post a Comment

0 Comments