प्रार्थना - जय जय जय प्रथमेशा


जय जय जय प्रथमेशा, गणेशा,
जय जय जय प्रथमेशा, गणेशा,
मंगलमय कर सारे जीवन,
शिवसुता तुज करितो वंदन
मंगलमय कर सारे जीवन,
शिवसुता तुज करितो वंदन
जय जय जय प्रथमेशा, गणेशा || धृ ||
उरी निराशा,खंत नसू दे,
सदा हर्ष, आनंद असू दे,
पावनतेचा गंध वसू दे,
रुजू दे, फुलू दे (2)
फुलू दे नव अभिलाषा, गणेशा,
जय जय जय प्रथमेशा, गणेशा || 1 ||
@@@@Music@@@@
आकांक्षाला पंख फुटू दे,
प्रतिभेचे नव रंग चढू दे,
उल्हासाने जीवन भरू दे,
बहर नवा दे या उन्मेशा (2)
जय जय जय प्रथमेशा, गणेशा(2) || 2 ||
मंगलमय कर सारे जीवन,
शिवसुता तुज करितो वंदन
जय जय जय प्रथमेशा, गणेशा
जय जय जय प्रथमेशा, गणेशा, गणेशा, गणेशा...


गीत - आनंद कुलकर्णी , संगीत  प्रभुदत्त मिसर 


 संगीतानं माणसाच्या मनाचा वेध घेता येतो.माणसाच्या जडणघडणीत गाण्याचा महत्वाचा वाटा असतो.लहानपणी होणारे संस्कार पुढे आयुष्यभर त्याला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असतात.
       बालकांच्यामध्ये लहानपणापासुनच विविध संस्कारांचं बीजारोपण व्हावं; शाळांमध्ये बालसुलभ वातावरण तयार होऊन मुलं शाळेत रमावीत; बालकांना योग्य ती स्वरलिपी,योग्य तो आवाज, योग्य तो चढउतार यांचे मार्गदर्शन मिळावे याकरिता "महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तथा  विद्या परिषद पूणे " यांनी 15 निवडक गितांची रचना "गीतावली" या नावाने तयार केली आहे.
     हे बनवताना या विद्यापरिषदेचे संचालक श्री. नामदेवराव जरग यांची प्रेरणा,  विद्या परिषदेच्या कलाकारांचे योगदान तसेच बालचित्रवाणी अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे..या सर्वांना साष्टांग दंडवत. प्रस्तुत गीतेे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न... 

प्रार्थना - नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

Post a Comment

0 Comments

सध्या ब्लॉग डिझाईन चे काम सुरु आहे. लवकरच परिपूर्ण ई-साहित्य उपलब्ध होईल.