गुरुजनांना स्मरा तुम्ही हो, गुरुजनांना स्मरा | हृदयस्पर्शी प्रार्थना
कृतार्थ करण्या जन्म आपुला, नित्य स्मरा गुरुवरा

गुरुजनांना स्मरा तुम्ही हो, गुरुजनांना स्मरा

Music
गुरुवर्यांना करता वंदन, आयुष्याचे होईल चंदन

( आयुष्याचे होईल चंदन, आयुष्याचे होईल चंदन )
सदैव स्मरुनी गुरुजनांना, सन्मार्ग हो धरा
सदैव स्मरुनी गुरुजनांना, सन्मार्ग हो धरा
गुरुजनांना स्मरा तुम्ही हो, गुरुजनांना स्मरा
गुरुजनांना स्मरा तुम्ही हो, गुरुजनांना स्मरा
Music
जिथे भक्तीने गुरुचे स्मरण, तिथे घडते ज्ञानार्जन

( तिथे घडते ज्ञानार्जन, तिथे घडते ज्ञानार्जन )
ज्ञानामृत हे अखंड सेवून, आयुष्या उद्धरा
ज्ञानामृत हे अखंड सेवून, आयुष्या उद्धरा
गुरुजनांना स्मरा तुम्ही हो, गुरुजनांना स्मरा
गुरुजनांना स्मरा तुम्ही हो, गुरुजनांना स्मरा
Music
ज्ञानभक्तीच्या उजळूनी ज्योती, गुरुजनांची गावी आरती

( गुरुजनांची गावी आरती, गुरुजनांची गावी आरती )
सद्भावांच्या भावफुलांनी, पूजन गुरुचे करा
सद्भावांच्या भावफुलांनी, पूजन गुरुचे करा
गुरुजनांना स्मरा तुम्ही हो, गुरुजनांना स्मरा
गुरुजनांना स्मरा तुम्ही हो, गुरुजनांना स्मरा
कृतार्थ करण्या जन्म आपुला, नित्य स्मरा गुरुवरा
कृतार्थ करण्या जन्म आपुला, नित्य स्मरा गुरुवरा
गुरुजनांना स्मरा तुम्ही हो, गुरुजनांना स्मरा
गुरुजनांना स्मरा तुम्ही हो, गुरुजनांना स्मरा
( गुरुजनांना स्मरा तुम्ही हो, गुरुजनांना स्मरा
गुरुजनांना स्मरा तुम्ही हो, गुरुजनांना स्मरा )
गीतकार- एस.के.पाटील सर
संगीत व निर्मिती - प्रविण डाकरे सर
गायन - श्रद्धा सिमाल , प्रविण डाकरे सर , वेदिका गवळी
कोरस कंसात दिलेला आहे.