संवर्ग भाग 1 आणि संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी फॉर्म भरण्याकरिता खालील लिंक ला क्लिक करा.
Open होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व Send OTP ऑप्शन वर क्लिक करा.
आपल्या मोबाईल नंबर वर OTP आला असेल तो टाकून लॉगिन करा.
मोबाईलच्या स्क्रीनच्या डावीकडे वरच्या कोपऱ्यात आडव्या तीन रेषा दिसतात. त्या तीन रेषांवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 8 ऑप्शन दिसतील.
त्यापैकी आपण Intra District (जिल्हाअतंर्गत) या टॅब वर क्लिक केल्यानंतर त्याखालील Application (अर्ज) हा टॅब दिसेल त्या टॅबला क्लिक करा.
Open होणाऱ्या पेजवर आपणास-
1) संवर्ग भाग 1 अर्ज करा.
(Apply Cadre 1)
2) संवर्ग भाग 2 अर्ज करा.
(Apply Cadre 2)
असे दोन टॅब दिसतील.
ज्या शिक्षकांना संवर्ग 1 मध्ये आपली नोंदणी करायची आहे त्यांनी 👉🏼संवर्ग भाग 1 अर्ज करा त्यावर क्लिक करा.
अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी , अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल . असे disclaimer दिसेल त्या disclaimer च्या बाजूच्या बॉक्समध्ये टिक करा.
त्याखाली आपणास आपले नाव ;आडनाव आपला शालार्थ आयडी व आपल्या शाळेचा यु डायस क्रमांक दिसेल.
त्याखाली आपणास "बदलीतून सूट हवी आहे काय" हा टॅब दिसेल त्या टॅब वर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर त्याखाली Yes व No हे दोन ऑप्शन दिसतील.
जर आपणास बदलीतून सूट घ्यायची आहे म्हणजेच बदली करायची नाही अशा शिक्षकांनी Yes वर क्लिक करावे आणि ज्या शिक्षकांना बदली करायची असेल त्यांनी No वर क्लिक करावे.
(या ठिकाणी लक्षपूर्वक Yes आणि No ऑप्शन निवडा येथे चुका होऊ शकतात)
त्यानंतर विशेष संवर्ग भाग 1 प्रकार निवडा या टॅब वर क्लिक करा त्यानंतर आपणास, "self" व "Spouse" असे दोन ऑप्शन दिसतील जर आपण स्वतः व्याधीग्रस्त असाल तर "self "आणि जर आपला जोडीदार आजाराने व्याधीग्रस्त असेल तर "Spouse" निवडा आपण drop down मध्ये जाऊन आपला संवर्ग 1 मधील जो उपप्रकार असेल त्यावर क्लिक करा (self मध्ये एकूण1 ते 14 उपप्रकार असतील Spouse मध्ये 15 ते 20 उपप्रकार असतील)
(Yes ऑप्शन आपण निवडले तर आपले नाव पुढील कोणत्याही यादीमध्ये येणार नाही आणि No ऑप्शन निवडल्यास जर आपल्याला आपल्या प्राधान्यक्रमातून शाळा न मिळाल्यास आपली बदली पुढील संवर्गातून होऊ शकते)
आपण भरलेले दोन्ही ऑप्शन पुन्हा चेक करा व त्यानंतर खालील Submit या बटन वर क्लिक करून आपली माहिती Submit करा.
Submit वर क्लिक केल्याबरोबर आपल्याला ओटीपी मागितल्या जाईल तो ओटीपी टाका व त्यानंतर आपला फॉर्म सबमिट केल्या जाईल.
अशाप्रकारे संवर्ग 1 चे शिक्षक आपला फॉर्म नोंदणी मोबाईल वरून करू शकतात.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
शिक्षकांनी विशेष संवर्ग 1 व विशेष संवर्ग 2 चा लाभ घेण्यासाठी बदली portal वर फॉर्म कसा भरावयाचा याबाबत...
विशेष संवर्ग 1 व विशेष संवर्ग 2 चे लाभ घेण्यासाठी पुढील flowchart चा वापर करून फॉर्म भरावा...
👉 सुरवातीला तुमच्या mobile number ने बदली portal वर login करावे...
सुरुवातीला बदली portal वर विशेष संवर्ग 1 व विशेष संवर्ग 2 फॉर्म भरण्यासाठी तुम्हीला इंग्रजी भाषेमध्ये सर्व माहिती दिसेल तुम्हाला मराठी भाषेमध्ये माहिती हवी असेल तर screen वरील वरच्या बाजूला English व मराठी असे दिसत आहे त्यातील मराठी यावर click केले की तुम्हाला सर्व माहिती मराठी मध्ये open होईल...
👉 त्यानंतर portal वरील डाव्या बाजूच्या menu मधून ज्यावेळी आपण स्वतःचे profile update केले होते त्या profile Tab च्या खाली Intra District(जिल्हांतर्गत) ही Tab आहे त्यावर click करून त्यातील उप tab open करावी...
👉 आपल्यापुढे त्या उप tab मध्ये Aplication Form(अर्ज) हा tab दिसेल त्यावर click करावे...
👉 त्यानंतर मोबाईलवर फॉर्म भरणार असाल तर screen वर मध्यभागी Intar List मध्ये APPLY CADRE 1️⃣(विशेष संवर्ग 1) व APPLY CADRE 2️⃣ (विशेष संवर्ग 2 ) हे दोन निळ्या रंगतील tab दिसतील,जर copmputer वर फॉर्म भरणार असाल तर वरील दोन पर्याय screen च्या वरच्या डाव्या बाजूस दिसतील...
विशेष संवर्ग 1
👉 ज्या शिक्षकांना विशेष संवर्ग 1 चा लाभ घ्यायचा आहे त्यांनी APPLY CADRE (विशेष संवर्ग 1) यावर click करावे...
👉 त्यानंतर तुमच्या screen वर Intra District Transfer Form open होऊन विशेष संवर्ग 1 चा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी बाबत विचारले जाईल त्यातील डाव्या बाजूला असणाऱ्या छोट्या check box ☑️ मध्ये click करून त्या सर्व अटी स्वीकाराव्या लागतील...
👉 check box ☑️ मध्ये click करून त्या सर्व अटी स्वीकारल्या नंतर संवर्ग 1 मधून लाभ घेण्याचा अर्ज screen वर दिसेल त्या अर्जात शिक्षकाचे स्वतःचे नाव,आडनाव,शालार्थ id व सध्याच्या शाळेचा udise क्रमांक दिसेल ते बरोबर असल्याची खात्री करावी...
👉 त्याखाली संवर्ग 1 साठी फॉर्म भरताना खालील महत्वाचा प्रश्न विचारला जाणार आहे त्याचे उत्तर खूप काळजीपूर्वक नोंदवावे याच प्रश्नावर विशेष संवर्ग 1 अंतर्गत बदलीचा लाभ घ्यायचा आहे किंवा नाही हे system ला समजणार आहे...
👉 संवर्ग 1 मध्ये विचारला जाणारा प्रश्न - Do You Want Exemption From Transfer...? ( तुम्हाला बदली तून सूट हवी आहे का...?)
👉 बदलीतून सूट हवी असल्यास त्या प्रश्नातील drop down menu मधून YES पर्याय निवडणे त्यामुळे तुमची बदली सध्याच्या शाळेवरून होणार नाही तसेच YES निवडल्यास तुम्ही जरी बदलीपात्र असाल तरी तुमची बदली सध्याच्या शाळेवरून इतर शाळेवर होणार नाही व तुम्हाला इतर संवर्गांकडून Tagged केले जाणार नाही...
👉 जर बदलीतून सूट नको असल्यास व सध्याच्या शाळेवरून बदली हवी असेल तर त्या प्रश्नातील drop down menu मधून NO पर्याय निवडणे...
👉 त्यानंतर खालील select cadre 1 category (विशेष संवर्ग भाग 1 प्रकार निवडा) यामध्ये तुम्ही स्वतः संवर्ग 1 मधून लाभार्थी असाल तर 18 जून 2024 च्या शासन निर्णयाप्रमाणे drop down menu मधून self (स्वतः) हा पर्याय निवडावा...
👉 त्याखालील दिलेल्या select special cadre part 1 तुपे (विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत लागू होणारा प्रकार निवडा) मध्ये drop down menu मधून शासन निर्णयानुसार विशेष संवर्ग 1 मधून तुम्हाला लागू होणारे 1.8.1 ते 1.8.14 यातील (1 ते 14) पैकी एक पर्याय निवडावा लागेल...
👉 तसेच select cadre 1 category (विशेष संवर्ग भाग 1 प्रकार निवडा) यामध्ये तुमचा spouse(जोडीदार) आजारी/व्याधीग्रस्त असेल तर 18 जून 2024 च्या शासन निर्णयाप्रमाणे तुम्हीला लाभ घ्यायचा असेल तर यातील drop down menu मधून spouse(जोडीदार) हा पर्याय निवडावा...
👉 त्याखालील दिलेल्या select special cadre part 1 type मध्ये drop down menu मधून शासन निर्णयानुसार विशेष संवर्ग 1 मधून तुम्हाला लागू होणारे 1.8.15 ते 1.8.20 यातील (15 ते 20) पैकी एक पर्याय निवडावा लागेल...
👉 त्यानंतर खाली निळ्या रंगातील SUBMIT या tab वर click करून संवर्ग 1 साठीचा फॉर्म submit करणे...
विशेष संवर्ग 2
👉 ज्या शिक्षकांना विशेष संवर्ग 2 चा लाभ घ्यायचा आहे त्यांनी APPLY CADRE 2️⃣( विशेष संवर्ग 2) यावर click करावे...
👉 त्यानंतर त्यांना त्यांच्या screen वर Intra District Transfer Form open होऊन विशेष संवर्ग 2 चा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी बाबत विचारले जाईल त्यातील डाव्या बाजूला असणाऱ्या छोट्या check box ☑️ मध्ये click करून त्या सर्व अटी स्वीकाराव्या लागतील...
👉 check box ☑️ मध्ये click करून त्या सर्व अटी स्वीकारल्या नंतर संवर्ग 2 मधून लाभ घेण्याचा अर्ज screen वर दिसेल त्या अर्जात शिक्षकाचे स्वतःचे नाव,आडनाव,शालार्थ id व सध्याच्या शाळेचा udise क्रमांक दिसेल ते बरोबर असल्याची खात्री करावी...
👉 त्यानंतर खाली दिलेल्या Distance between the present postings should be greater than 30 km (तुमच्या व जोडीदाराच्या शाळेतील अथवा कार्यालयातील अंतर 30 किमी पेक्षा जास्त आहे ते नोंदवणे...)
👉 त्याखाली दिलेल्या select कॅटेगरी (विशेष संवर्ग 2 चा प्राधान्य क्रमांक निवडा) मध्ये 18 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार तुम्हाला संवर्ग 2 मधून लागू होणारे 1.9.1 ते 1.9.7 यातील (1 ते 7) पैकी एक पर्याय निवडावा...
👉 जर तुम्ही 1.9.1 पति-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी हा पर्याय 1 निवडला तर..
👉 त्याखाली Spouse Teacher Type मध्ये Primary हा पर्याय निवडला तर पुढील spouse shalarth id/mobile number यामध्ये जोडीदाराचा शालार्थ id किंवा मोबाईल क्रमांक टाकावा...
👉 दोघेही जिल्हा परिषदेतील शिक्षक असाल तर जोडीदाराचा शालार्थ id किंवा मोबाईल नंबर नोंदवल्यावर तुम्हाला screen वर एक pop of window open होईल त्यातील ACCEPT या tab वर click करावे त्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या जोडीदाराची सर्व माहिती तुम्हाला दिसेल त्या माहितीच्या आधारे तुमच्या जोडीदाराला बदली प्रक्रियेत system कडून lock केले जाईल...
👉 त्यानंतर संवर्ग 2 साठीचा फॉर्म submit करावा...
👉 जर Spouse Teacher Type मध्ये Other Than Primary हा पर्याय निवडला तर spouse name,spouse school name/Organisation name ही माहिती भरावी...
👉 त्यानंतर संवर्ग 2 साठीचा फॉर्म submit करणे...
👉 1.9.1 व्यतिरिक्त शासन निर्णयातील मुद्दा क्र.1.9.2 ते 1.9.7 (पर्याय 2 ते 7) लागू असणाऱ्या शिक्षकांसाठी खालील प्रमाणे फॉर्म मध्ये माहिती भरावी...
👉 select category (विशेष संवर्ग 2 चा प्राधान्य क्रमांक निवडा) मध्ये 18 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार तुम्हाला विशेष संवर्ग 2 मधून लागू होणारे 1.9.2 ते 1.9.7 यातील (2 ते 7) पैकी एक पर्याय निवडावा...
👉 त्यानंतर संवर्ग 2 साठीचा फॉर्म submit करावा...
फक्त माहितीसाठी...🙏