आला पाऊस आला... टप टप टप
चला वाजवू टाळ्या... टप टप टप ||धृ ||
घरे नाहली सुंदर झाली,
वळचणीला पाखरे आली,
गप गप गप ||१||
आला रे आला वारा तुफान,
पानापानात घाली थैमान,
सप सप सप ||२||
पाऊस आला चिखल झाला,
चंदनात त्या नाचूया चला,
रप रप रप ||३||
टप टप टप.....गप गप गप
सप सप सप....रप रप रप
टप टप टप...टप टप टप
टप टप.