समूहगीत -हिमालयाशी सांगती नाते


हिमालयाशी सांगती नाते सह्यगिरीचे कडे (2)
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे (2) || धृ ||
दगडांचा हा देश छाती दगडाची याची
अभंग आवेशाच्या मागे स्फूर्ती शिवबाची
दगडांचा हा देश छाती दगडाची याची
अभंग आवेशाच्या मागे स्फूर्ती शिवबाची
राष्ट्रधर्म हा एकच नारा बुद्धी शक्तीच्या पुढे (2)
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे (2) || 1 ||
गडागडांवर कड्याकड्यांवर इतिहासाच्या खुणा
मनामनांवर मंत्र घालूनी देत नव्या प्रेरणा
गडागडांवर कड्याकड्यांवर इतिहासाच्या खुणा
मनामनांवर मंत्र घालूनी देत नव्या प्रेरणा
मान रक्षिण्या इथे शिंपिले रक्ताचे किती सडे (2)
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे (2) || 2 ||
संतांचा हा देश सोयरा पिडीत दुःखितांचा
वीरांचा हा देश आक्रमक रक्षक दीनांचा
संतांचा हा देश सोयरा पिडीत दुःखितांचा
वीरांचा हा देश आक्रमक रक्षक दीनांचा
तळपत राहील सदैव जोवरी चंद्र सूर्य हे खडे (2)
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे (2) || 3 ||
हिमालयाशी सांगती नाते सह्यगिरीचे कडे (2)
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे (3)
⧭ Mp3 ऐका खालील बटणावरून ⧭


⧭ कराओके Mp3 ऐका खालील बटणावरून ⧭



गीत - विद्या बापट  ,  संगीत – विश्वनाथ दाशरथे


 संगीतानं माणसाच्या मनाचा वेध घेता येतो.माणसाच्या जडणघडणीत गाण्याचा महत्वाचा वाटा असतो.लहानपणी होणारे संस्कार पुढे आयुष्यभर त्याला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असतात.
       बालकांच्यामध्ये लहानपणापासुनच विविध संस्कारांचं बीजारोपण व्हावं; शाळांमध्ये बालसुलभ वातावरण तयार होऊन मुलं शाळेत रमावीत; बालकांना योग्य ती स्वरलिपी,योग्य तो आवाज, योग्य तो चढउतार यांचे मार्गदर्शन मिळावे याकरिता "महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तथा  विद्या परिषद पूणे " यांनी 15 निवडक गितांची रचना "गीतावली" या नावाने तयार केली आहे.
     हे बनवताना या विद्यापरिषदेचे संचालक श्री. नामदेवराव जरग यांची प्रेरणा,  विद्या परिषदेच्या कलाकारांचे योगदान तसेच बालचित्रवाणी अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे..या सर्वांना साष्टांग दंडवत. प्रस्तुत गीतेे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न... 

समूहगीत - आनंदाचे गाणे

Post a Comment

0 Comments