गाडी आली गाडी आली चला पळा रे
गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा
रे ॥ धृ॥
गाडी आली कोकणातून, आंबे आणले भरून
भरून
आंबे उतरून घ्यारे आणि धक्का मारा रे
॥ १॥
गाडी आली वसईहून, केळी आणली भरून
भरून
केळी उतरून घ्यारे आणि धक्का मारा रे
॥ २॥
गाडी आली नागपूरहून, संत्री आणली
भरून भरून
संत्री उतरून घ्यारे आणि धक्का मारा
रे ॥ ३॥
गाडी आली काश्मीरहून, सफरचंद आणली
भरून भरून
सफरचंद उतरून घ्यारे आणि धक्का मारा
रे ॥ ४॥
Tags
पहिली मराठी कविता