वेडं कोकरू - पहिली मराठी Mp3 कविता

वेडं कोकरू खूप थकलं


येताना घरी वाट चुकलं


अंधार बघून भलतच भ्यालं


दमून दमून झोपेला आलं


शेवटी एकदा घर दिसलं


वेडं कोकरू गोड हसलं


डोकं ठेवून गवताच्या उशीत


हळूच शिरलं आईच्या कुशीत.


                      - मंगेश पाडगावकर






Post a Comment

0 Comments