जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल
अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल
तबल्यावर होती कोल्होबाची साथ
वाघोबा म्हणाले, नाही ना बात?
पेटी मी किती वाजवतो सुंदर
हसत हसत म्हणाले साळींदर.
गुंडू –पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची
हौस
संतूर वाजवू म्हणाले चीकीमिकी माऊस!
मुंगीने लावला वरचा सां
आवाज आवाज ओरडला ससा.
ठुमकत नाचत आला मोर
वन्समोअर, वन्समोअर झाला शोर!
- पूर्वी भावे
Tags
पहिली मराठी कविता