अग्गोबाई ढग्गोबाई - पहिली मराठी Mp3 कविता

अग्गोबाई.. ढग्गोबाई .. लागली कळ

ढगाला उन्हाची केवढी झळ !

थोडी न थोडकी , लागली फार !

डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ॥धृ॥

वारा वारा गरागरा सो सो सूम...

ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम...

वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये  खडी

आकाशाच्या पाठीवर चम चम छडी !! ॥१॥

खोल खोल जमिनीचे उघडुन दार

बुड बुड बेडकाची बडबड फार !

डुंबायला डबक्याचा करू या तलाव

साबु-बिबु नको..थोडा चिखल लगाव!! ॥२॥                               

- संदीप खरे  

Post a Comment

14 Comments

 1. कृतीयुक्त video असता तर अधिक रोचक झाले असते.

  ReplyDelete
 2. कृतियुक्त हव होते

  ReplyDelete
 3. खुपच छान आवाज आहे सर तुमचा.

  ReplyDelete
 4. तुम्हाला mp3 पाठवलेली आहे. व्हिडीओ लिंक - https://youtu.be/Meue4HeLwX8

  ReplyDelete
 5. सुंदर पण व्हिडिओ करायला हवा होता

  ReplyDelete
 6. सर खुपच छान कविता चालींवर आहेत धन्यवाद सर आमची मुल फायदा घेत आहेत

  ReplyDelete
 7. अप्रतीम चाल संगीत ....मस्त आवज

  ReplyDelete

सध्या ब्लॉग डिझाईन चे काम सुरु आहे. लवकरच परिपूर्ण ई-साहित्य उपलब्ध होईल.