🐂 बैलजोडी
दुसरी मराठी कविता
नवीन अभ्यासक्रमावर आधारित
कवी - डॉ. प्रकाश सपकाळे
📖 कविता
माझ्या मामाच्या गावाला
आहे छान बैलजोडी
जोडी खिल्लाऱ्या बैलांची
तिची मला भारी गोडी
🎵 Music 01
वावरात शेतकरी मामा
गाळतसे घाम
मामाची ही बैलजोडी
मामासंगे करी काम
🎵 Music 02
ओढी वखर नांगर
कोळपणी वावरात
कष्ट करी रातंदिस
तेव्हा पीक देई हात
🎵 Music 03
येता पोळ्याचा हा सण
मामा करी बैलपूजा
पुरणपोळीचा नैवेद्य
बैलांसंगे येई मजा
🎵 End Music
आहे छान बैलजोडी
जोडी खिल्लाऱ्या बैलांची
तिची मला भारी गोडी
🎵 Music 01
वावरात शेतकरी मामा
गाळतसे घाम
मामाची ही बैलजोडी
मामासंगे करी काम
🎵 Music 02
ओढी वखर नांगर
कोळपणी वावरात
कष्ट करी रातंदिस
तेव्हा पीक देई हात
🎵 Music 03
येता पोळ्याचा हा सण
मामा करी बैलपूजा
पुरणपोळीचा नैवेद्य
बैलांसंगे येई मजा
🎵 End Music
🎯 या कवितेतून विद्यार्थी काय शिकतील?
- बैलांचे शेतीतील महत्त्व
- शेतकऱ्याचे कष्ट
- पोळा सणाची माहिती
- प्राणीप्रेम व ग्रामीण संस्कृती
- मराठी भाषेचे सुंदर पाठांतर
Tags
चौथी मराठी कविता