आनंदी-आनंद गडे
इयत्ता चौथी मराठी कविता
कवी - त्र्यंबक बापुजी ठोंबरे (बालकवी)
📖 संपूर्ण कविता
🎵 Intro Music
आनंदी-आनंद गडे, इकडे, तिकडे, चोहिकडे
वरती-खाली, मोद भरे, वायूसंगे मोद भरे
नभात भरला, दिशांत फिरला,
जगात उरला, मोद विहरतो चोहिकडे ॥१॥
वरती-खाली, मोद भरे, वायूसंगे मोद भरे
नभात भरला, दिशांत फिरला,
जगात उरला, मोद विहरतो चोहिकडे ॥१॥
🎵 Music 01
सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे;
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे;
मेघ रंगले, चित्त दंगले,
गान स्फुरले, इकडे, तिकडे, चोहिकडे ॥२॥
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे;
मेघ रंगले, चित्त दंगले,
गान स्फुरले, इकडे, तिकडे, चोहिकडे ॥२॥
🎵 Music 02
वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती,
पक्षि मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे !
कमल विकसले, भ्रमर गुंगले,
डोलत वदले, इकडे, तिकडे, चोहिकडे ॥३॥
पक्षि मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे !
कमल विकसले, भ्रमर गुंगले,
डोलत वदले, इकडे, तिकडे, चोहिकडे ॥३॥
🎵 Music 03
स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो ? सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला,
आता उरला, इकडे, तिकडे, चोहिकडे ॥४॥
त्यांना मोद कसा मिळतो ? सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला,
आता उरला, इकडे, तिकडे, चोहिकडे ॥४॥
Tags
चौथी मराठी कविता