🇮🇳 चौथी मराठी कविता - तिरंगा 🇮🇳
नवीन अभ्यासक्रमावर आधारित
🎵 प्रकार : देशभक्तीपर कविता
✍ कवी : डॉ. प्रकाश गोसावी
विश्वशांतीचे.. अन् समतेचे..
विश्वशांतीचे अन् समतेचे ब्रीद आपुले राखू या,
चला चला रे आज तिरंगा या खांदयावर मिरवू या..

जात धर्म ते विसरून जाऊ...
जात धर्म ते विसरून जाऊ, आपण सारे भाऊ भाऊ

भारतभूच्या.. छत्राखाली..
भारतभूच्या छत्राखाली ऐक्य आपुले राखू या,
चला चला रे आज तिरंगा या खांदयावर मिरवू या..
चला चला रे आज तिरंगा या खांदयावर मिरवू या..
भीती न आम्हां मुळी कुणाची...
भीती न आम्हां मुळी कुणाची, अभेद्य छाती हिमालयाची

भय कशाला.. आक्रमणाचे..
भय कशाला आक्रमणाचे शूर शिपाई होऊ या,
चला चला रे आज तिरंगा या खांदयावर मिरवू या..
चला चला रे आज तिरंगा या खांदयावर मिरवू या..
पाऊल आता पुढेच टाकू...
पाऊल आता पुढेच टाकू, भारतभूची कीर्ती राखू

हरितक्रांतीचा, विज्ञानाचा..
हरितक्रांतीचा, विज्ञानाचा मंत्र संजीवन गाऊ या,
चला चला रे आज तिरंगा या खांदयावर मिरवू या..
विश्वशांतीचे.. अन् समतेचे..
विश्वशांतीचे अन् समतेचे ब्रीद आपुले राखू या,
चला चला रे आज तिरंगा या खांदयावर मिरवू या..
चला चला रे आज तिरंगा या खांदयावर मिरवू या..
🎓 GuruMauli YouTube Channel
अशाच सुंदर कविता, गीते व शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे YouTube Channel Subscribe करा.
▶️ व्हिडिओ पाहा