📖 इयत्ता तिसरी मराठी
प्रार्थना - शोधिसी मानवा
🙏 शोधिसी मानवा 🙏
शोधिसी मानवा, राउळी मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी
शोधिसी मानवा, राउळी मंदिरी
मेघ हे दाटती कोठुनी अंबरी
सूर येती कसे, वाजते बासरी
रोमरोमी फुले, तीर्थ हे भूवरी
दूर इंद्रायणी दूर ती पंढरी
शोधिसी मानवा, राउळी मंदिरी
गंध का हासतो पाकळी सारुनी
वाहते निर्झरी प्रेमसंजीवनी
भोवताली तुला साद घाली कुणी
खूण घे जाणुनी रूप हे ईश्वरी
शोधिसी मानवा, राउळी मंदिरी
भेटतो देव का पूजनी अर्चनी
पुण्य का लाभते दानधर्मातुनी
शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी
आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी
शोधिसी मानवा, राउळी मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी
शोधिसी मानवा, राउळी मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी
शोधिसी मानवा, राउळी मंदिरी
मेघ हे दाटती कोठुनी अंबरी
सूर येती कसे, वाजते बासरी
रोमरोमी फुले, तीर्थ हे भूवरी
दूर इंद्रायणी दूर ती पंढरी
शोधिसी मानवा, राउळी मंदिरी
गंध का हासतो पाकळी सारुनी
वाहते निर्झरी प्रेमसंजीवनी
भोवताली तुला साद घाली कुणी
खूण घे जाणुनी रूप हे ईश्वरी
शोधिसी मानवा, राउळी मंदिरी
भेटतो देव का पूजनी अर्चनी
पुण्य का लाभते दानधर्मातुनी
शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी
आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी
शोधिसी मानवा, राउळी मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी
शोधिसी मानवा, राउळी मंदिरी
— कवयित्री : वंदना विटणकर
📚 इयत्ता : तिसरी
📖 विषय : मराठी
🎵 प्रकार : प्रार्थना
🎯 नवीन अभ्यासक्रम : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ
📖 विषय : मराठी
🎵 प्रकार : प्रार्थना
🎯 नवीन अभ्यासक्रम : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ
Tags
तिसरी मराठी कविता