🌧️ सरावन मईन्यात
इयत्ता चौथी मराठी कविता | नवीन अभ्यासक्रम
🎬 कविता व्हिडिओ
📖 कविता
सरावन मईन्यात होते मोटाच नवल
सरावन मईन्यात होते मोटाच नवल
सात रंगाचा तोरन कसा अबारी चोवल
सात रंगाचा तोरन कसा अबारी चोवल
सरावन मईन्यात ढगा ढोल वाजवती
सरावन मईन्यात ढगा ढोल वाजवती
कारजात धाकधुक ईजा किल्लोर करती
कारजात धाकधुक ईजा किल्लोर करती
सरावन मईन्यात पाका फुलवते मोर
सरावन मईन्यात पाका फुलवते मोर
नाचं ठाटात माटात संगा धरून लांडोर
नाचं ठाटात माटात संगा धरून लांडोर
सरावन मईन्यात पानी भुरुक भुरुक
सरावन मईन्यात पानी भुरुक भुरुक
कानी भेपक्याचा गाना राती डुरुक डुरुक
कानी भेपक्याचा गाना राती डुरुक डुरुक
सरावन मईन्यात झाला पानी भोवताल
सरावन मईन्यात झाला पानी भोवताल
धारा नाचत नाचत थेंबा धरतेत ताल
धारा नाचत नाचत थेंबा धरतेत ताल..
🌈 कवितेचा आशय
"सरावन मईन्यात" ही कविता श्रावण महिन्यातील निसर्गसौंदर्याचे सुंदर चित्र उभे करते. इंद्रधनुष्य, ढगांचा गडगडाट, मोराचे नृत्य, बेडकांचे गाणे आणि पावसाच्या सरी यांचे रम्य वर्णन या कवितेत केले आहे.