डिंगोरी
डिंगडिंग डिंगोरी
भिंगभिंग भिंगोरी
गरगर फिरली
चक्कर येऊन पडली
ट्रिंगट्रिंग सायकल
धावधाव धावली
घरभर भटकून
धपकन धडकली
किल्लीचा ससोबा
तुरुतुरु धावला
गवत खायला
बागेत पळाला
निळ्या-निळ्या डोळ्यांची
चिमुकली बाहुली
पऱ्यांच्या राज्यात
भटकायला गेली
बाळाची खेळणी
खेळ - खेळ खेळली
दमून भागून
कपाटात झोपली
-मंदा खांडगे
वरील कविता कराओके संगीतवर ऐका खालील बटणावरुन...
Tags
दुसरी मराठी कविता