फुलांच्या दुनियेत
फुलपाखरू दंग
हळूच टिपते
फुलांचे रंग ..
फुलावर बसते
खुदकन हसते
फुलांचे रंग
पंखांना फासते...
निळसर-जांभळे
ठिपके छान
सोनेरी रंगाची
सुंदर कमान...
फुलांच्या दुनियेत
फुलपाखरू दंग
पंखांना त्याच्या
फुलांचे रंग...
- दादासाहेब कोते
कराओके कविता ऐका खालील बटणावरून...
Tags
दुसरी मराठी कविता