टिंब
एकदा एक टिंब
इकडे तिकडे हिंडले
शब्दांच्या बागेमध्ये
फुलपाखरू झाले
एकदा एक टिंब
इकडे तिकडे हिंडले
शब्दांच्या बागेमध्ये
फुलपाखरू झाले
'नदी'चा केला 'नंदी'
'माडी'ची केली 'मांडी'
'नदी'चा केला 'नंदी'
'माडी'ची केली 'मांडी'
'बाबू'चा केला 'बांबू'
'कुडी'ची केली 'कुंडी'
'बाबू'चा केला 'बांबू'
'कुडी'ची केली 'कुंडी'
एकदा एक टिंब
इकडे तिकडे हिंडले
शब्दांच्या बागेमध्ये
फुलपाखरू झाले
'शेडी'ची झाली 'शेंडी'
"अग' झालं 'अंग'
'शेडी'ची झाली 'शेंडी'
"अग' झालं 'अंग'
'भाडे' बनले 'भांडे'
'रग' बनला 'रंग'
'भाडे' बनले 'भांडे'
'रग' बनला 'रंग'
एकदा एक टिंब
इकडे तिकडे हिंडले
शब्दांच्या बागेमध्ये
फुलपाखरू झाले
हिंडून हिंडून असे
टिंब अगदी दमले
हिंडून हिंडून असे
टिंब अगदी दमले
वाक्याच्या शेवटी येऊन
पूर्णविराम बनले
वाक्याच्या शेवटी येऊन
पूर्णविराम बनले
एकदा एक टिंब
इकडे तिकडे हिंडले
शब्दांच्या बागेमध्ये
फुलपाखरू झाले
एकदा एक टिंब
इकडे तिकडे हिंडले
शब्दांच्या बागेमध्ये
फुलपाखरू झाले
🌸 कविता आवडली का?
👍 Like करा
↗️ मित्रांना Share करा
🔔 अशाच मराठी शैक्षणिक व्हिडिओंसाठी Subscribe करा
💬 तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये जरूर लिहा.