गे मायभू तुझे मी
देशभक्तीपर गीत
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे
आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे
मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी
माझी ललाटरेषा बनते प्रयाग काशी
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे
🇮🇳 गे मायभू तुझे मी 🇮🇳
व्हिडिओ आवडल्यास नक्की Like 👍 करा.
आपल्या मित्रांना आणि विद्यार्थ्यांना Share ↗️ करा.
अशाच शैक्षणिक व मराठी गीतांसाठी Subscribe 🔔 करा.