🎶 चौथी मराठी कविता - वासुदेव
हातात चिपळ्या, गळ्यात माळा
मोरपिसांची टोपी, गाता गळा
हातात चिपळ्या, गळ्यात माळा
मोरपिसांची टोपी, गाता गळा
वासुदेव आला हो वासुदेव आला
घोळदार झगा, काखेत झोळी
खांदयावर शेला, टिळा कपाळी
घोळदार झगा, काखेत झोळी
खांदयावर शेला, टिळा कपाळी
वासुदेव आला हो वासुदेव आला
पावा वाजवीत, येई अंगणात
देवाची गाणी, गाई सुरात
पावा वाजवीत, येई अंगणात
देवाची गाणी, गाई सुरात
वासुदेव आला हो वासुदेव आला
सुपातील धान्य, झोळीत घेई
'दान पावलं', आरोळी देई
सुपातील धान्य, झोळीत घेई
'दान पावलं', आरोळी देई
वासुदेव आला हो वासुदेव आला
मुलांचा घोळका, जमतो भोवती
आनंदाला मग, येतेच भरती
मुलांचा घोळका, जमतो भोवती
आनंदाला मग, येतेच भरती
वासुदेव आला हो वासुदेव आला
सकाळच्या पारी, हरीनाम बोला
गाव जागं करायला, वासुदेव आला
सकाळच्या पारी, हरीनाम बोला
गाव जागं करायला, वासुदेव आला
वासुदेव आला हो वासुदेव आला
वासुदेव आला हो वासुदेव आला
📚 विद्यार्थ्यांसाठी सूचना
- कविता प्रथम ऐका आणि नंतर मोठ्याने वाचा.
- कवितेतील 'वासुदेव' या लोकपरंपरेविषयी माहिती जाणून घ्या.
- कठीण शब्दांचे अर्थ समजून घ्या.
- कवितेतील ताल, लय आणि भाव समजून पाठांतर करा.
- कवितेतून लोकसंस्कृतीचे महत्त्व समजून घ्या.