🌳 चौथी मराठी कविता - बाभूळ
मराठी कविता | इयत्ता चौथी | सुंदर वाचन व अर्थ
गोल पिवळ्या फुलांची
बाभळीची शाल झाली,
दिसे किती डौलदार
हळदीचा रंग ल्याली.
बाई बाभळीच्या शेंगा
जसे लोंबते तोरण,
ऊन झिरपते खाली
जाते रांगोळी काढून.
जरी अंगावर काटे
तरी मन निरमळ,
तिच्या लाकडाचा होई
बाई नांगराला फाळ.
आहे राकट बाभूळ
तिचे किती गाऊ गुण,
तिच्या काटेरी फांद्यांचं
होई शेतीला कुंपण.
कधी बाभूळबाईचा
काटा पायात रुततो,
पाय जपून टाकावा
मला शिकवून जातो.
विद्यार्थ्यांसाठी सूचना :
✅ कविता दोन-तीन वेळा मोठ्याने वाचा.
✅ कठीण शब्दांचे अर्थ समजून घ्या.
✅ कवितेतील निसर्गचित्रांचे निरीक्षण करा.
✅ कवितेचा भावार्थ समजून पाठांतर करा.
✅ कविता दोन-तीन वेळा मोठ्याने वाचा.
✅ कठीण शब्दांचे अर्थ समजून घ्या.
✅ कवितेतील निसर्गचित्रांचे निरीक्षण करा.
✅ कवितेचा भावार्थ समजून पाठांतर करा.
Tags
चौथी मराठी कविता