आई मला छोटीशी बंदूक दे ना !
बंदूक घेईन । शिपाई होईन ।
ऐटीत चालीन । एक दोन तीन ॥ १॥
आई मला छोटीशी मोटार दे ना !
मोटार घेईन । ड्रायव्हर होईन ।
गावाला जाईन । पों पों पों ॥ २॥
आई मला छोटेसे विमान दे ना !
विमान घेईन । पायलट होईन ।
आकाशी जाईन । भर भर भर ॥ ३॥
आई मला छोटीशी बाहुली दे ना !
बाहुली घेईन । तिजला मी सजवेन ।
ती संगे नाचेन । छुम छुम छुम ॥ ४ ॥
Tags
पहिली मराठी कविता