🌍 चौथी मराठी कविता 🌍
नाते जगाशी
निळ्या बिलोरी आभाळावर
मेघ काढती नक्षी,
निळ्या बिलोरी आभाळावर
मेघ काढती नक्षी,
त्या नक्षीच्या पुढ्यात सुंदर
घेत भरारी पक्षी.
त्या नक्षीच्या पुढ्यात सुंदर
घेत भरारी पक्षी.
मेघ काढती नक्षी,
निळ्या बिलोरी आभाळावर
मेघ काढती नक्षी,
त्या नक्षीच्या पुढ्यात सुंदर
घेत भरारी पक्षी.
त्या नक्षीच्या पुढ्यात सुंदर
घेत भरारी पक्षी.
उघडा दारे, उघडा खिडक्या
मनही आता उघडा,
ज्ञानाचे अन् विज्ञानाचे
पंख लेवुनि उडा.
मनही आता उघडा,
ज्ञानाचे अन् विज्ञानाचे
पंख लेवुनि उडा.
शुद्ध मोकळ्या वातावरणी
रमून जावे ऐसे,
खुशाल गावे आणिक व्हावे
आपण अपुले आरसे.
रमून जावे ऐसे,
खुशाल गावे आणिक व्हावे
आपण अपुले आरसे.
चौकट तोडा आणिक जोडा
सर्व जगाशी नाते,
फुलून येतो श्वास गोजिरा
मनही मोठे होते.
सर्व जगाशी नाते,
फुलून येतो श्वास गोजिरा
मनही मोठे होते.
Tags
चौथी मराठी कविता