🙏 हीच अमुची प्रार्थना 🙏
इयत्ता चौथी
✍️ गीतकार
समीर सामंत
समीर सामंत
🎤 गायिका
सौ. अपूर्वा प्रविण डाकरे
सौ. अपूर्वा प्रविण डाकरे
हीच अमुची प्रार्थना
अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे ॥ ध्रु ॥
भोवताली दाटला
अंधार दुःखाचा जरी
सूर्य सत्याचा उद्या
उगवेल आहे खात्री
तोवरी देई आम्हाला
काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे ॥१॥
धर्म, जाती, प्रांत, भाषा
द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा,
एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर
शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे ॥२॥
लाभले आयुष्य जितके
ते जगावे चांगले
पाऊले चालो पुढे..
जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता
तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे ॥३॥
— समीर सामंत
अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे ॥ ध्रु ॥
भोवताली दाटला
अंधार दुःखाचा जरी
सूर्य सत्याचा उद्या
उगवेल आहे खात्री
तोवरी देई आम्हाला
काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे ॥१॥
धर्म, जाती, प्रांत, भाषा
द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा,
एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर
शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे ॥२॥
लाभले आयुष्य जितके
ते जगावे चांगले
पाऊले चालो पुढे..
जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता
तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे ॥३॥
— समीर सामंत
📖 प्रार्थनेचा अर्थ
"हीच अमुची प्रार्थना" ही विद्यार्थ्यांना मानवता, प्रेम, समानता, बंधुभाव, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार यांचा संदेश देणारी अत्यंत प्रेरणादायी प्रार्थना आहे. अंधार कितीही दाटला तरी सत्याचा सूर्य उगवणारच, हा विश्वास या प्रार्थनेत व्यक्त केला आहे. धर्म, जाती, भाषा यापेक्षा माणुसकी मोठी असून प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमाने आणि समानतेने वागावे, असा संदेश या प्रार्थनेतून मिळतो.
Tags
चौथी मराठी कविता