☁️ आभाळाचा फळा ☀️
इयत्ता दुसरी - मराठी कविता
आभाळाच्या फळयावर
किती किती चित्रे
रांगेत पळतात
ससे भित्रे
ढगांचे केवढे
पळतात हत्ती
आभाळात सारखी
करतात मस्ती
मधेच चमकते
किरणांची सतार
रंगांचे गालिचे
पसरतात हजार
आभाळात उमटतात
सात मजली वाडे
उपडे होतात
रंगांचे घडे
अचानक काय झाले
गडप चित्रे सारी
समुद्रात बुडाली
सूर्याची स्वारी
✍️ कवयित्री : डॉ. लीला दीक्षित
🎬 कविता व्हिडिओ
YouTube Video येथे दिसेल
Tags
दुसरी मराठी कविता