🌧️ पाऊस 🌧️
इयत्ता दुसरी - मराठी कविता
आभाळ वाजलं धडाड धुम
वारा सुटला सूं सूं सुम्म
वीज चमकली चक चक चक
जिकडे तिकडे लख लख लख
पाऊस आला धो धो धो
पाणी वाह्यलं सों सों सों
पाण्यात बोट सोडली सोडली
हातभर जाऊन बुडली बुडली
बोटीवर बसला बेडुक बेडुक
तो ओरडला डरांव डुक डरांव डुक
✍️ कवयित्री : सरिता पदकी
🎬 कविता व्हिडिओ
Tags
दुसरी मराठी कविता