रंगीत लांब शेपटीचा
पतंग माझा ऐटीचा
कागद, काड्या, दोरा, डिंक
मीच त्याला लावलेत पंख
ठाण मांडून तासन् तास
पतंग माझा केलाय खास
बघा ना कसा उडतोय वर
सगळ्यांच्या पुढे सर सर सर
रंगीत शेपटी घेतेय झेप
'तुम्हाला हवाय?' देईन ना एक
मंदाकिनी गोडसे
Tags
पहिली मराठी कविता