मऊ मऊ मेंढी दुलईची,
लोकर तिची गं मलईची
लुबू लुबू गवतात बागडते,
वाऱ्याच्या शेतात हुंदडते
झुळ झुळ झऱ्याचं पाणी पिते,
बें बें सुरात गाणे गाते
गळ्यात घालुन बसते हात,
तिचेही गाणे माझ्या गळ्यात
मऊ मऊ ठिपक्यांचा दाटे कळप,
वेळ ही जाई झप् झप् झप्
प्रवीण दवणे
Tags
पहिली मराठी कविता