कविता पहा-
झोक्या रे झोक्या
चल उंच जाऊ
चिमणीच्या बाळांना
हळूच पाहून येऊ !
झोक्या रे झोक्या
चल उंच जाऊ
कावळ्याला घर
बांधून देऊ !
झोक्या रे झोक्या
चल उंच जाऊ
हिरव्या पोपटाला
गोड पेरू देऊ !
झोक्या रे झोक्या
चल उंच जाऊ
ताईसाठी माझ्या
कैऱ्या घेऊन येऊ !
- डॉ. स्मिता पाटील
Tags
पहिली मराठी कविता