माझ्या या दारातून - व्हिडिओ पहा.
लिरिक्स-
कोण कोण येतेऽ कोण कोण येतेऽ
मामा येतो नि मामी येते
गोड गोड खाऊ देऊन जाते
माझ्या या दारातून
कोण कोण येतेऽ कोण कोण येतेऽ
काका येतो नि काकी येते छान छान बाहुली देऊन जाते
माझ्या या दारातून
माझ्या या दारातून
कोण कोण येतेऽ कोण कोण येतेऽ
दादा येतो नि वहिनी येते
चणे फुटाणे देऊन जाते
माझ्या या दारातून
कोण कोण येतेऽ कोण कोण येतेऽ
बाबा येतात नि आई येते
गोड गोड पापी घेऊन जाते
अनुताई वाघ
बाबा येतात नि आई येते
गोड गोड पापी घेऊन जाते
अनुताई वाघ
Tags
पहिली मराठी कविता