ए आई मला पावसात जाऊ दे - व्हिडिओ पहा
लिरिक्स -
ए आई मला पावसात जाऊ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे ।। धृ ॥
मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभातुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचू दे ।। १ ।
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करू दे ।। २॥
धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे ।
- वंदना विटणकर

Tags
पहिली मराठी कविता