गायन केलेली कविता
कराओके कविता
Music 4 3 2 1
माय मराठी तुझिया पायी तनमनधन मी वाहियले,
तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले.
माय मराठी तुझिया पायी तनमनधन मी वाहियले,
तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले.
Music 4 3 2 1
कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई,
मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई.
तुझे झरे अन् तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा,
हवाहवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा.
Music 4 3 2 1
माय मराठी तुझिया अंकी लोळण घेते, बागडते,
तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते.
तुझे चालणे, तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी,
जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी.
Music 4 3 2 1
तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची,
अर्थ साजरा, गंध लाजरा, नवलपरी पण रंगांची.
माय मराठी तुझियासाठी वात होउनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
माय मराठी तुझिया पायी तनमनधन मी वाहियले,
तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले.
तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले.
कविता - संजीवनी मराठे
संगीत व कराओके व्हिडीओ निर्मिती
प्रविण डाकरे, जयदिप डाकरे
खालील बटनाला क्लिक करून कविता ऐका. सराव करा.
गीत गायन - प्रविण डाकरे
वरील कविता खाली संगीत ट्रॅॅकवर सराव करा.
Tags
पाचवी मराठी कविता