Saturday, April 15, 2017

जुनी पेंशन हक्क गीत

लेखन व गायन - प्रविण डाकरे  

प्रेरणा - पत्रकार मा.मारुती फाळके सर

चाल - खेळ मांडला

जुन्या पेंशनची बात कागदावं राही

साद देती कर्मचारी ऐकंना हो कुणी

आंदोलनं करुनही जाग कुणा नाही

हरवली वाटदिशा अंधारल्या दाही

आधार हा वार्धक्याचा लागे टांगणीला

आधार ह्यो का रे खुंटला....

खेळ मांडला... खेळ मांडला...
सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा

तूच वाट दाखीव गा खेळ मांडला

दावी देवा पैलपार पाठीशी तू र्‍हा हुबा

ह्यो तुझ्याच उंबर्‍यात खेळ मांडला

कुटुंबकल्याण बंद झालं आधार कुणाचा न्हाई

परिभाषिक अंशदायी योजना,उध्वस्त कुटुंब पाही

बळ दे लढायाला निर्वाहाचा मार्ग दे

इनविती लाभार्थी हे आतातरी न्याय दे

करपलं आश्वासन जळलं निवेदन

तरी न्हाई धीर सांडला.....

खेळ मांडला.... खेळ मांडला....


एक आर्त हाक गीतातून मांडण्याचा प्रयत्न... हे गीत डाऊनलोड करा वरील बटणावरुन.. 

No comments:

Post a Comment