सध्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या गणित विषयाच्या ऑनलाईन टेस्ट अपडेट होत आहेत.

Tuesday, May 24, 2016

ZP शाळा गुणवत्ता गीत

आज माझ्या लग्नाचा वाढदिवस. .या औचित्याने ...

खालील गीत Mp3 डाऊनलोड करा - download

 आपल्या शाळेची महती .... (चालं- झिंगाट )
हे गीत  लिहीणारे गीतकार  माहीत नाही. . त्यांना  खूप  धन्यवाद. ..त्यांचे नाव समजल्यास मला अवश्य कळवा. .

गुणवत्ता गीत 

अरं उरात होतय धडधड , शाळा गावात रं आली ,
सर्व शिक्षा अभियानान पोरं शिकून हुशार झाली ;
आता अधीर झालो या , नको उशीर कराया,
अन फ्यूचर साठी खाजगी सोडून zpत  आलोया,
पोरं उडतयं बुंगाट , पळतय चिंगाट , शाळा रंगात न्हालिया .......
झालंय झिंग झिंग झिंगाट .... झिंग

आता उताविळ झालो हलक , पाठी दफतर बांधल,
तुझ्या नावाचं गं गुणगाण समद्या गावांन गाईलं,
उड्या मारत आलोया, छाती ताणून आलो या ,
अन् खेळत सारं टेन्शन इसरून पूढं गेलोया !
समद्या पोरांत zp चेचं जोरात , रंगांत आलेया,
झालयं झिंग झिंग झिग झिंगाट ......

समद्या गावाला रं वाटे माझ्या शाळेची नवलाई ,
पोरं zp च्याच शाळेत घाला , करू नका हो कुचराई ,
शाळा भरात आलिया , सर दारात आलेयात,
देऊन फुकाट प्रवेश , भारी गणवेश चढवून आलोया,
अरं ढिंगच्यांग जोरात , भाताची परात खाऊन आलोया,
झालंय झिंग झिंग झिंगाट .........

No comments:

Post a Comment

Featured Post

दुसरी गणित ऑनलाईन टेस्ट क्र. १७.वजाबाकीने कमी करूया

दुसरी प्रज्ञाशोध परीक्षा व घटक सरावाच्या दृष्टीने प्रस्तुत सराव टेस्ट खूप महत्त्वाची आहे. या प्रश्नपत्रिकेची अभ्यासपूर्ण निर्मिती केलेली ...

ऑनलाईन टेस्ट बाबत आपल्या प्रतिक्रिया वरील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.