कोण बनेल टेस्ट टॉपर? प्रश्नमंजुषा सोडवण्याची 30 सप्टेंबर शेवटची मुदत.. प्रमाणपत्र १ तारखेला..
कोण बनेल टेस्ट टॉपर? आकारिक पेपर

दहावी सेतू अभ्यासक्रम | Bridge Course | 45 दिवस | SCERT PUNE

इयत्ता दहावी - सेतू अभ्यासक्रम 

BRIDGE COURSE 

सौजन्य : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र 

हा सेतू अभ्यास सोडवताना काही कृतींमध्ये अडचणी आल्यास न समजलेला किंवा अवघड वाटणारा भाग समजून घेण्यासाठी शिक्षकांची किंवा पालकांची मदत घ्या. सदरील सेतू अभ्यासक्रम आपल्याला दिवसानुसार सहजरित्या उपलब्ध व्हावा म्हणून समाविष्ट केलेला आहे. 
नवीन शैक्षणिक व्हिडीओंंसाठी खालील गुरुमाऊली चॅॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन ठेवा.

प्रत्येक दिवसाचा अभ्यास सराव करा.

 दिवस   अभ्यास लिंक 
दिवस पहिला 
दिवस दुसरा 
इथे क्लिक करा
दिवस तिसरा 
इथे क्लिक करा
दिवस चौथा 
इथे क्लिक करा
दिवस पाचवा 
इथे क्लिक करा
दिवस सहावा 
इथे क्लिक करा
दिवस सातवा 
इथे क्लिक करा
दिवस आठवा 
इथे क्लिक करा
दिवस नववा 
इथे क्लिक करा
दिवस दहावा 
इथे क्लिक करा
दिवस अकरा 
इथे क्लिक करा
दिवस बारा
इथे क्लिक करा
दिवस तेरा
इथे क्लिक करा
दिवस चौदा 
इथे क्लिक करा
दिवस पंधरा(चाचणी १)
इथे क्लिक करा
दिवस सोळा
इथे क्लिक करा
दिवस सतरा
इथे क्लिक करा
दिवस अठरा
इथे क्लिक करा
दिवस एकोणीस  

इथे क्लिक करा
दिवस वीस  
इथे क्लिक करा
दिवस एकवीस   
इथे क्लिक करा
दिवस बावीस   
इथे क्लिक करा
दिवस तेवीस   
इथे क्लिक करा
दिवस चोवीस   
इथे क्लिक करा
दिवस पंचवीस   
इथे क्लिक करा
दिवस सव्वीस   
इथे क्लिक करा
दिवस सत्तावीस   
इथे क्लिक करा
दिवस अठ्ठावीस   
इथे क्लिक करा
दिवस एकोणतीस   
इथे क्लिक करा
दिवस तीस(चाचणी २)  
इथे क्लिक करा
दिवस एकतीस  
इथे क्लिक करा
दिवस बत्तीस  

इथे क्लिक करा
दिवस तेहतीस   
इथे क्लिक करा
दिवस चौतीस    
इथे क्लिक करा
दिवस पस्तीस    
इथे क्लिक करा
दिवस छत्तीस    
इथे क्लिक करा
दिवस सदतीस    
इथे क्लिक करा
दिवस अडतीस    
इथे क्लिक करा
दिवस एकोणचाळीस    
इथे क्लिक करा
दिवस चाळीस    
इथे क्लिक करा
दिवस एक्केचाळीस    
इथे क्लिक करा
दिवस बेचाळीस    
इथे क्लिक करा
दिवस त्रेचाळीस   
इथे क्लिक करा
दिवस चव्वेचाळीस    
इथे क्लिक करा
दिवस ४५ (चाचणी ३)   

इथे क्लिक करा

सेतु अभ्यासक्रम - विद्यार्थ्यांशी हितगुज

मागील शैक्षणिक वर्षात तुम्ही ऑनलाईन व इतर विविध मार्गाने तुमचं शिक्षण सुरू ठेवलंत. तुमचं खूप खूप कौतुक! आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. पुन्हा जोमाने आपल्याला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला काही दिवस आपणाला मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमाची उजळणी करायला हवी. जेणेकरून या वर्षीच्या अभ्यासक्रमासाठी चांगली पूर्वतयारी होईल. ही पूर्वतयारी करणे सोयीचे व्हावे यासाठीच हा सेतू अभ्यास तयार करण्यात आला आहे. मागील शैक्षणिक वर्षात तुम्ही नेमके काय शिकला हे समजण्यासाठी आणि पुढील इयत्तेचा पाठ्यक्रम समजून घेण्यासाठी हा सेतू अभ्यास तुम्हाला मदत करणार आहे. 
त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? तर हा सेतू अभ्यास दिवस निहाय क्रमाने सोडवायचा आहे. यात वेगवेगळ्या कृतींचा समावेश आहे. या कृती सोडवताना तुम्हाला मजा येईल. पण लक्षात ठेवा, या कृती दिवसनिहाय तयार केलेल्या आहे. तुम्ही दिलेल्या नियोजनाप्रमाणे कृती स्वप्रयत्नाने सोडवाव्यात. कृती सोडवताना अडचण आल्यास शिक्षक किंवा पालकांची मदत घ्यावी. प्रत्येक कृती मध्ये दिलेला पाठ्यांश अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी व्हिडीओ लिंक दिलेल्या आहेत, त्यांचा उपयोग करून संकल्पना समजून घेण्यास मदत होईल. 
आणि हो, हा 45 दिवसांचा सेतू अभ्यास करताना यामध्ये दर पंधरा दिवसांनी तुम्हाला एक छोटीशी चाचणी सोडवायची आहे. चाचणी स्वतः एकट्याने सोडवा. चाचणी सोडवून झाल्यावर शिक्षकांकडून तपासून घ्या.
हा सेतू अभ्यास सोडविताना काही भाग जसे की, चला सराव करूया, सक्षम बनूया यामधील कृतीमध्ये अडचण आल्यास, न समजलेला किंवा अवघड वाटणारा भाग समजून घेण्यासाठी शिक्षकांची किंवा पालकांची मदत घ्या. 

सेतू अभ्यासक्रम - शिक्षक/पालकांसाठी सूचना

     covid-19 च्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मागील शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष विद्यार्थी समोर असताना वर्ग अध्यापन होऊ शकले नाही. नव्या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होतील याबाबत अनिश्चितता आहे. मागील शैक्षणिक वर्षात आपण ऑनलाईन माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी विविध प्रयत्न केलेत. मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून हा सेतू अभ्यास तयार करण्यात आला आहे. 
 • सेतू अभ्यास हा मागील इयत्तेच्या पाठ क्रमावर आधारित असून मागील इयत्तेचा पाठ्यक्रम व सध्याच्या इयत्तेचा पाठ्यक्रम यांना जोडणारा दुवा आहे.
 • सदर सेतू अभ्यास हा इयत्ता निहाय व विषय निहाय तयार करण्यात आला असून तो मागील इयत्तेच्या पाठ्यपुस्तकाशी संलग्न व त्यातील घटकांवर आधारित आहे.
 • सदर अभ्यासात क्षेत्र, कौशल्य, संकल्पना व अध्ययन निष्पत्ती/क्षमता विधाने यांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांना नेमके काय मार्गदर्शन करायचे आहे यासाठी मदत होईल.
 • संकल्पना प्रमाणे सबंधित संकल्पनेबाबत विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जाणून घेण्यासाठी 'जाणून घेऊया' त्या संकल्पनेबाबत त्याने अधिक सक्षम व्हावे यासाठी 'सक्षम बनूया' मिळालेल्या माहितीचे किती आकलन झाले यासाठी 'सराव करूया' व मिळालेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्याने आधी चिकित्सक विचार करावा सर्जनशील व्हावे अर्थात उच्च बोधात्मक क्षमतांच्या विकासासाठी 'कल्पक होऊया' या सदरांचा समावेश केला आहे.
 • संकल्पना अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी मदत हवी म्हणून सर्वच कृतीमध्ये दीक्षा ॲप, क्यूआर कोड इत्यादीची मदत घ्यावी.
 • मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थी नेमके काय शिकले हे समजण्यासाठी, त्याची चाचपणी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेतील संकल्पना समजून घेण्यासाठी व अध्ययनासाठी हा सेतू अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
 • सेतू अभ्यास एकूण 45 दिवसांचा असून त्यात ठराविक कालावधीनंतर घ्यावयाच्या एकूण तीन चाचण्यांचा समावेश आहे.
 • शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून सदरचा सेतू अभ्यास दिवस निहाय नियोजनाप्रमाणे पूर्ण करून घ्यावा.
 • चला सराव करूया हे सदर विद्यार्थी स्वप्रयत्नाने सोडवतील. याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे. आवश्यक तेथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
 • निश्चित केलेल्या कालावधीनंतर घ्यावयाच्या चाचण्या विद्यार्थ्यांकडून सोडवून घ्याव्यात. चाचण्या तपासून विद्यार्थी निहाय गुणांची नोंद स्वतःकडे ठेवावी.
 • चाचणी तपासताना विद्यार्थी निहाय विश्लेषण करून मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मदत करावी.
 • सदरील सेतू अभ्यास हा शिक्षकांसाठी असला तरीही शाळा ऑफलाइन सुरू असल्याकारणाने याचा वापर करून पालक, शिक्षक व मित्र यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाचे उजळणी व पुढील इयत्तेत शिकावयाच्या कृतींची किंवा अभ्यासक्रमाची पूर्वतयारी घेऊ शकतील.
 • या सेतू अभ्यासात दिलेल्या अध्ययन कृती या मार्गदर्शक असून शिक्षक आपल्या वर्गाच्या व विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांच्या अध्ययन संदर्भात इतर आवश्यक त्या कृती घेऊ शकतात.
 • वयानुरूप समकक्ष वर्गातील मुलांसाठी एस सी ई आर टी मार्फत तयार केलेल्या विद्यार्थी मित्र व शिक्षक मार्गदर्शिका यांचा संदर्भ म्हणून उपयोग करावा.

सेतू अभ्यासक्रम - उद्दिष्टे

 • covid-19 च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मनात अध्ययनाविषयी आत्मविश्‍वास निर्माण करून शिकण्यासाठी आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे.
 • विद्यार्थ्यांना गत शैक्षणिक वर्षातील संबंधित इयत्तेच्या प्रत्येक विषयांतील अध्ययनातील अंतर भरून काढण्यास मदत करणे.
 • विद्यार्थ्यांना मागील इयत्तानुरुप सर्व विषयातील अपेक्षित अध्ययन निष्पत्ती नुसार समजपूर्वक वाचनाची संधी उपलब्ध करून संबंधित क्षमता वृद्धिंगत होण्यास मदत करणे.
 • विद्यार्थ्यांना मागील इयत्तेशी जोडून घेण्यासाठी स्वयं अध्ययनासाठी उपयुक्त अशा आनंददायी व कृतीयुक्त आशयाची निर्मिती करणे.
 • विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून देणे.

सेतू अभ्यासक्रम - अपेक्षित कौशल्य/संकल्पना (अध्ययन क्षेत्र)

 1. मौखिक भाषा विकास
 2. ध्वनीची जाण
 3. लिपीची जाण (परिचय)
 4. वाचन
 5. लेखन


इतर लिंक
माझा अभ्यास PDF - 1 ली ते 7 वी 
इयत्ता पहिली - ऑनलाईन टेस्ट 
इयत्ता दुसरी - ऑनलाईन टेस्ट 
इयत्ता तिसरी - ऑनलाईन टेस्ट 
इयत्ता चौथी - ऑनलाईन टेस्ट 
इयत्ता पाचवी - ऑनलाईन टेस्ट 
इयत्ता सहावी - ऑनलाईन टेस्ट 
इयत्ता सातवी - ऑनलाईन टेस्ट 


Disclaimer : प्रस्तुत सेतू अभ्यासक्रम निर्मितीचे सर्वाधिकार हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे यांचे आहेत. सदर सेतू अभ्यास शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण सुलभरित्या देता यावे म्हणून एकत्रित केलेला असून सुलभरित्या उपलब्ध करून दिलेला आहे. यात आमचा दुसरा कोणताही हेतू नाही.

Post a Comment

3 Comments

 1. This abhyaskram is for semi english students??? Because they dnt have this chapters in marathi , science , maths ??? Plz slove this as soon as possible

  ReplyDelete
 2. Please give math and science in English

  ReplyDelete

आपल्या कमेंट चे स्वागत आहे.