आज कोण वार हो,
आज कोण वार ?
आज आहे सोमवार
डोंगर पाहा हिरवेगार
आता आला मंगळवार
वारा वाहे गारगार
आला आला बुधवार
वेलीवरती फुले फार
आता आला गुरुवार
फुलांचा केला छान छान हार
आला आला शुक्रवार
उड्या मारी धिटुकली खार
आता आला शनिवार
आकाशात उडते घार
आला आला रविवार
खेळ खेळू फार फार
सप्ताहाचे सात वार
फिरुनी येती वारंवार