एक होता भोपळा
त्याला आला खोकला
खोकून खोकून थकला
फटकन् फुटला
भोपळ्याच्या बिया
रानभर झाल्या
पाऊस पडताच
तरारून आल्या
भोपळ्याचे वेल
वाढत गेले
भोपळ्याच्या वेलांना
भोपळे आले
कोवळे कोवळे
छान छान भोपळे
आजीने बाजारात
नेऊन विकले
- दादासाहेब कोते
Tags
पहिली मराठी कविता