रात्री स्वप्नात
आली एक परी
म्हणे चल जाऊ
चांदोबाच्या घरी
चांदोबानं घर
ढगांत बांधलं
चांदणी तोरण
दारात टांगलं
चांदोबाचा रथ
आकाशात पळतो
पांढरा ससोबा
ढगात धावतो
चांदोबाच्या दारी
चांदण्यांची बाग
मुलं आणि फुलं
दिसती जागोजाग
विलास मोरे
Tags
पहिली मराठी कविता