मराठी प्रतिज्ञा


प्रतिज्ञा -मराठी 

      भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.
     माझ्या देशावर माझे प्रेम आहे.माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
     मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
     माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे.

⧭ Mp3 ऐका खालील बटणावरून ⧭


⧭ व्हिडिओ पहा खालील बटणावरून ⧭
Post a Comment

1 Comments