How to create Online Test using Google Form in Marathi | गुगल फॉर्म च्या मदतीने ऑनलाईन टेस्ट कशी बनवायची?

     गुगल फॉर्म च्या मदतीने ऑनलाईन टेस्ट कशी बनवली जाते, प्रश्न कसे समाविष्ट केले जातात, इमेज कशा समाविष्ट करायच्या, आपण प्रत्येक घटकावर ही टेस्ट कशी काढू शकतो याचे सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. आपण प्रत्येक घटकावर ऑनलाईन टेस्ट काढू शकता. बनवलेली टेस्ट इतरांना शेअर करू शकता अथवा ब्लॉग ला समाविष्ट करू शकता. चला तर मग पाहूया सविस्तर माहिती-

गुगल फॉर्म च्या मदतीने ऑनलाइन टेस्ट बनवण्यासाठी आपले गुगल ड्राईव्ह चे अकाउंट असणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याजवळ ई-मेल आयडी व पासवर्ड असणे गरजेचे आहे. सोबत हेडर इमेज व ज्या इमेज अथवा व्हिडिओ समाविष्ट करणार आहात, ते अगोदर बनवून ठेवले तर, सुरवातीलाच डिझाईन करून ठेवली तर वेळ वाया जात नाही. आता पाहूया प्रत्यक्ष प्रोसेस -

1. तुमच्याकडे असलेला Chrome Browser किंवा Firefox Browser किंवा Opera browser ‌ओपन करा. गुगल सर्च बॉक्समध्ये सुरवातीला drive.google.com टाईप करा व सर्च करा.

(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

2. सर्च केल्यानंतर तुम्हाला ड्राईव्ह ओपन करण्यासाठी सुरुवातीला ईमेल आयडी व पासवर्ड टाकावा लागेल. पासवर्ड टाकल्यानंतर ड्राईव्ह ओपन झालेले दिसून येईल. ओपन झाल्यानंतर डाव्या बाजूला Drive या बटनाच्या खाली 'New' हा टॅब तुम्हाला दिसून येईल. 'New' या बटनाला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली 'More' हे बटण तुम्हाला दिसून येईल. त्या बटनावर कर्सर सरकवल्यानंतर उजव्या बाजूला गुगल फॉर्म हा टॅब तुम्हाला दिसून येईल. गुगल फॉर्म या टॅबला क्लिक करा.

(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

3. सुरुवातीला टायटल मध्ये तुम्ही ज्या घटकाची टेस्ट बनवणार आहात त्या घटकाचे नाव टाईप करा. हेच टायटल वरील Untitled from मध्ये देखील कॉपी करून टाका. टायटल च्या खाली Description म्हणजे सब टायटल टाका. सबटायटल च्या ठिकाणी  तुम्ही इयत्ता, विषय व उपघटक कोणता आहे हे टाकू शकता. म्हणजेच सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन टेस्टचे टायटल व सबटायटल टाकायचे आहे.
(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

4. त्यानंतर वरील थीम (Theme) या टॅब ला क्लिक करून आपल्याला हेडर इमेज समाविष्ट करायची आहे. हेडर इमेजमध्ये तुम्ही तुमच्या शाळेचा फोटो, तुमचा फोटो किंवा तुमच्या blog चा url समाविष्ट करु शकता. Add Image ला क्लिक करून बनवलेली हेडर इमेज समाविष्ट करा. हेडर इमेज ची साईझ 800 × 200 ही साईझ चालू शकते. 

          हेडर इमेज समाविष्ट केल्यानंतर खालील Theme Colour या टॅबमधून तुम्ही बॅकग्राऊंड बदलू शकता. तुम्हाला बॅकग्राऊंड कलर बदलायचा असल्यास खालील अधिक (+) या चिन्हाला क्लिक करा व हवा तो कलर निवडा व Add या टॅब ला क्लिक करा. निवडलेला कलर लगेच बॅकग्राऊंडला बदललेला तुम्हाला दिसून येईल.

(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

5. यानंतर तुम्हाला सेटींग (Setting) या आयकॉनवर क्लिक करुन महत्वाची सेटिंग करून घ्यायची आहे. या सेटींगवरच गुगल फॉर्म ची टेस्ट बनणार आहे. ही सेटींग तीन प्रकारची आहे. याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

6. सेटींग या बटणाला क्लिक केल्यानंतर सुरवातीला General हा टॅब ओपन झालेला असेल. फावल्या बाजूला Collect email address हा ऑप्शन दिसतो. तेथे बॉक्स मध्ये टिकमार्क (बरोबर खूण) करु नका. आपण ई-मेल ऑप्शन तेव्हा निवडू शकतो, जेव्हा तुम्ही टेस्ट सोडवल्या नंतर तुम्ही प्रमाणपत्र देणार असाल किंवा एकाच ई-मेल ने एकच रिस्पॉन्स घेणार असाल. 
          त्याखालील फक्त शेवटच्या ऑप्शन समोरील बॉक्स मध्ये टिकमार्क करा. बाकीचे ऑप्शन तसेच रिकामे ठेवा.
(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

7. त्यानंतर Presentation या टॅब ला क्लिक करा. यामध्ये show progress bar या ऑप्शनला टिकमार्क करा. त्याखालील shuffle question order या ऑप्शन समोरील बॉक्सला क्लिक करु नका. कारण आपण प्रत्येक प्रश्नाला अनुक्रमांक देणार आहोत.shuffle question order या ऑप्शन समोरील बॉक्सला क्लिक केले तर अनुक्रम हा क्रमाने येणार नाही. त्यामुळे तो बॉक्स रिकामा ठेवा.

          त्यानंतर खालील तिसरा ऑप्शन हा Confirmation message चा आहे. हा टॅब टिकमार्क करा व खालील रिकाम्या जागेत तुम्ही मेसेज टाईप करा. मुले ज्यावेळी टेस्ट सोडवतील, त्यावेळी Submit बटणला क्लिक केल्यानंतर त्यांना Confirmation message दिसतो. या ओळींमध्ये  'आपण टेस्ट सोडवलेली आहे. निकाल पाहण्यासाठी खालील टॅबला क्लिक करा' ही ओळ टाकू शकता. 

(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

8. त्यापुढील शेवटची तिसरी सेटींग खूप महत्त्वाची असून ही सेटींग केल्याशिवाय ऑनलाईन टेस्ट तयार होत नाही. Quizzes या टॅबला क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला On  Off चे बटण दिसते ते  ऑन ठेवा. त्याखालील सर्व ऑप्शन ला टिकमार्क करा. 
          यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण या तीन टॅब वरील केलेली सेटिंग सेव्ह (save) करा. यासाठी उजव्या कोपर्‍यातील save बटणावर क्लिक करा. आपण ज्यावेळी टेस्ट बनवत असतो, त्यावेळी प्रश्न समाविष्ट केल्यानंतर शेवटी सेटिंग या टॅब ला क्लिक करून Save बटणावर क्लिक करावे. अन्यथा तुमचे प्रश्न काहीवेळा सेव्ह झालेले दिसणार नाहीत. 

(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)


9. यानंतर आता प्रत्यक्ष आपल्याला टेस्ट मधील मजकूर लेखन करायचे आहे. त्यामुळे सुरुवातीला विद्यार्थ्याचे नाव व शाळेचे नाव असे दोन टॅब बनवा. यासाठी कमांड Short answer ही ठेवा. पहिला टॅब बनवल्यावर खालील Duplicate या ऑप्शन ला क्लिक करून दुसरा टॅब बनवा व विद्यार्थ्याचे नाव हा शब्द काढून शाळेचे नाव हे शब्द टाईप करा. खालील Required ऑप्शन ऑन ठेवा.
(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

10. त्यानंतर उजव्या बाजूकडील अधिक (+) या बटणाला क्लिक करून आपण नवीन प्रश्न समाविष्ट करू शकतो. अधिक (+) बटणाला क्लिक करा व नवीन सुरवातीचा प्रश्न तयार करा.

(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

11. अधिक (+)  बटणाला क्लिक केल्यानंतर वर पहिल्या बॉक्स मध्ये पहिला क्रमांक टाकून प्रश्न समाविष्ट करा. प्रश्नाला इमेज जोडणार असाल तर प्रश्नाच्या पुढील इमेजच्या आयकॉनला क्लिक करून आपण बनवलेली इमेज घेऊ शकता. निवडलेली इमेज डाव्या बाजूला सरकलेली असेल. ती मधोमध आणण्यासाठी इमेजच्या बाजूला असलेल्या तीन उभ्या टिंबला क्लिक करा व दुसरा Center align हा ऑप्शन निवडा.इमेज  मधोमध येईल. 

          त्यानंतर आपण खालील Option या टॅब ला क्लिक करून प्रश्नाचे पर्याय समाविष्ट करू शकता. पुढील पर्याय निवडण्यासाठी खालील Add option ला क्लिक करा. आपण कितीही पर्याय समाविष्ट करू शकतो. सध्या आपल्याला चार पर्याय समाविष्ट करायचे आहेत.

(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

12. प्रश्नाचे पर्याय समाविष्ट केल्यानंतर आपल्याला आता प्रश्नाचे गुण व योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यासाठी खालील Answer key या बटणाला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर प्रश्नाच्या उजव्या बाजूला एका प्रश्नाला किती गुण देणार आहात तो अंक लिहा. मी 2 हा अंक लिहिला. त्यानंतर खालील चार पर्यायांपैकी बरोबर पर्यायाला क्लिक करा व खालील Done या ऑप्शन ला क्लिक करा. त्यानंतर खाली उजव्या बाजूला असलेला Required हा ऑप्शन ऑन करा.
(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

13. आता एक महत्वाची सेटिंग राहिली आहे.Required या ऑप्शन च्या उजव्या बाजूला तीन उभ्या टिंब दिसतात, त्या टिंब ला क्लिक करा. क्लिक केल्यावर पहिला Description नावाचा टॅब आहे. जर प्रश्नाच्या खाली काही माहिती लिहायची असल्यास Description  टॅब ला टिकमार्क करा. काही Description लिहायचे नसल्यास टिकमार्क करू नका. त्यानंतर section based answer हा टॅब टिकमार्क केला तरी चालेल किंवा नाही केला तरी चालेल.कारण आपल्याला section  बदलण्यासाठी हा  टॅब आहे. त्यानंतर Shuffle option order हा टॅब   टिकमार्क करा. कारण उत्तराचे पर्याय यामुळे सारखे वर-खाली बदलत असतात. या महत्वाच्या सेटिंग आहेत.

(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

14. जर आपल्याला एखाद्या दुसऱ्या बनवलेल्या टेस्टमधील एखादा प्रश्न किंवा  सर्व प्रश्न घ्यायचे असल्यास त्यासाठी Import Questions ला क्लिक करून प्रश्न निवडून या टेस्टमध्ये घेऊ शकतो.

(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

15. TT म्हणजेच नवीन टायटलDESCRIPTION  हवे असल्यास त्या टॅब ला क्लिक करून घेऊ शकतो.

(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

16. इमेजच्या चिन्हाला क्लिक करून एखादी इमेज मध्यभागी किंवा सुरवातीला किंवा शेवटी वापरणार असाल तर वापरू शकता. अधिक माहितीसाठी या  टॅब चा वापर करून योग्य ती इमेज वापरू शकता.

(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

17. व्हिडीओच्या चिन्हाला क्लिक करून एखादा व्हिडीओ मध्यभागी किंवा सुरवातीला किंवा शेवटी वापरणार असाल तर वापरू शकता. अधिक माहितीसाठी या  टॅब चा वापर करून योग्य तो व्हिडीओ वापरू शकता. सुरवातीला व्हिडीओ वापरून त्या व्हिडीओवर टेस्ट देखील बनवू शकता.

(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

18. सर्वात शेवटी जो ऑप्शन आहे तो Section . या टॅब चा वापर करून आपण नवीन सेक्शन बनवू शकता. पहिले सेक्शन Submit केल्यानंतरच दुसरे सेक्शन ओपन होईल. सुरवातीला आपली ओळख घेऊन, दुसऱ्या सेक्शनमध्ये आपण टेस्ट चे प्रश्न समाविष्ट करू शकतो.
(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

19. चित्रात दाखवलेल्या Preview  बटणाला क्लिक करून आपण बनवलेली टेस्ट कशी दिसते ते पाहू शकतो. काही चुका झाल्या आहेत की नाही ते टेस्ट स्वतः सोडवून तपासू शकतो.

(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

20. टेस्ट सोशल मिडीयावर पाठवण्यासाठी किवा तुम्हाला तुमच्या ग्रुपवर शेअर करण्यासाठी Send या बटणाला क्लिक करा.

(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

21. त्यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे लिंक बटणाला क्लिक करून खालील Shorten URL या ऑप्शन ला टिकमार्क करा. लिंक छोटी झालेली दिसेल. त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या Copy ऑप्शन ला क्लिक करून तुम्ही ही लिंक इतरांना शेअर करू शकाल.

(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

22. तुम्हाला ही बनवलेली टेस्ट तुमच्या ब्लॉगला पोस्टमध्ये समाविष्ट करायची असल्यास चित्रात दाखवलेल्या  टॅब ला क्लिक करा व खाली Embed HTML कोड Copy करून ब्लॉगला पोस्टमध्ये Edit html मध्ये जाऊन समाविष्ट करू शकता. आपल्याला परिपूर्ण माहिती मिळाली असेल अशी आशा बाळगतो.

(खालील इमेजला क्लिक करून झूम करून पहा.)

वरील सर्व माहिती व्हिडीओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
Post a Comment

2 Comments

सध्या ब्लॉग डिझाईन चे काम सुरु आहे. लवकरच परिपूर्ण ई-साहित्य उपलब्ध होईल.