माझा महाराष्ट्र - गीत


लोककल्याणकारी राजा शिवछत्रपती
नि शूरवीर, साधुसंत, नररत्नांची खाण
समतेचा संदेश गर्जतो माझा महाराष्ट्र 
या सारे मिळून गाऊ एकतेचे गुणगान
मनामनांत सळसळतो सह्याद्रीचा बाणा
कडेकपारीतून ऐकू येते कानी शिवगर्जना   
राष्ट्रभक्तीची धून आळवतो माझा महाराष्ट्र
पोवाड्यांतून शाहीर भेेटवी वीरा, वीरांगना  
विसरून जातो,धर्म,पंथ, वंश, लिंग भेद 
लढू करावया समुळ नष्ट  दुष्टांची दानवता
त्यागाची शिकवण देतो हा माझा महाराष्ट्र
या सारे या बलीदान देऊ रक्षिण्या मानवता
प्रांत, बोली, राहणी जरी भिन्न असे इथली
आपत्तीसमयी माणुसकीची जपतो हा नाती
राव असो वा रंक तयांना पोसतो माझा महाराष्ट्र
कृषिवलांच्या घामांतून तो पिकवतो मोती
गतिमान विकासचक्र हे उद्योगांच्या जाळ्यातूनी
कारखान्यांचा भोंगा निनादतो विकास जनात  
श्रमिकांच्या श्रमांतून सजतो हा माझा महाराष्ट्र
कामगार दिनी शुभेच्छांनी हा सुखावतो मनात
संतांच्या संदेश- शिकवणीचे स्मरूनिया पाठ
भावभक्ती अन् श्रद्धाही साठवी सदा हृदयांत
पुरोगामी विचारांना जपतो माझा महाराष्ट्र
साहित्यिकांच्या लेखनीतुन प्रगटतो सदैव शब्दांत

© चंद्रकांत जगन्नाथ माने सर (इस्लामपूर)

Post a Comment

0 Comments

सध्या ब्लॉग डिझाईन चे काम सुरु आहे. लवकरच परिपूर्ण ई-साहित्य उपलब्ध होईल.