रक्षाबंधन विशेष - हृदयस्पर्शी गीत

माझे लाडके ताई, तुझा दादा आला
आज रक्षाबंधन, राखी बांध मला...
वर्षानं सण आला, मनी हर्ष झाला
धागा रक्षणाचा, राखी बांध मला...
माझे लाडके ताई... //धृ//
नातं नातं अतुट हे, भावा-बहिणीचं
देई आधार तुला, तुझा भाऊराया...
ताई ओवाळ मला, आशीर्वाद तुला
करीन रक्षण तुझं, राखी बांध मला...
माझे लाडके ताई... //1//
तुझा संसार गं, सुखाचा होऊ दे
आनंदाचा झरा, नेहमी वाहू दे...
संकट आलं तुला, हाक मार मला
येईन धावत, राखी बांध मला...
माझे लाडके ताई... //2//
-

-गीत गायन व लेखन - प्रविण डाकरे 

प्रस्तुत गीत Mp3 स्वरूपात खालील इमेजला क्लिक करुन डाऊनलोड करा व आपली प्रतिक्रिया जरुर कळवा.. 

Post a Comment

0 Comments

सध्या ब्लॉग डिझाईन चे काम सुरु आहे. लवकरच परिपूर्ण ई-साहित्य उपलब्ध होईल.