सध्या (आजचा अभ्यास - शाळापूर्व तयारी)उपक्रम अंतर्गत पहिली ते सातवी PDF अभ्यास अपडेट होत आहे.

Friday, June 30, 2017

Save EARTH , Plant a TREE (झाड लावू चला ) -पर्यावरण संवर्धन गीत

खाली क्लिक करून व्हिडिओ पहा झाड लावू...  झाड वाढवू...
झाड लावू , झाड वाढवू , झाड जगवू चला...
झाड लावू चला गड्यांनो झाड लावू चला//धृ
देव पुजाया... गजरा कराया...
देव पुजाया, गजरा कराया, फूल देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //1//
उन्ह लागता... पाय भाजता...
उन्ह लागता, पाय भाजता, सावली देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //2//
भुक लागता... काही न मागता...
भुक लागता, काही न मागता, फळ देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //3//
घर बांधाया... वस्तू बनवाया...
घर बांधाया, वस्तू बनवाया, लाकूड देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //4//
रोग घालवाया... सदृढ बनवाया...
रोग घालवाया, सदृढ बनवाया, औषध देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //5//
आम्हा जगायला... श्वास घ्यायला...
आम्हा जगायला, श्वास घ्यायला, आॅक्सिजन देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //6//
धरती टिकवाया... शेती पिकवाया...
धरती टिकवाया, शेती पिकवाया, पाऊस देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //7//
- गीत लेखन, गायन व इडिटींगसह निर्मिती - प्रविण डाकरे 

प्रस्तुत गीत Mp3 स्वरूपात डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. आपली प्रतिक्रिया जरुर कळवा 

No comments:

Post a Comment

Featured Post

दुसरी गणित ऑनलाईन टेस्ट क्र. १७.वजाबाकीने कमी करूया

दुसरी प्रज्ञाशोध परीक्षा व घटक सरावाच्या दृष्टीने प्रस्तुत सराव टेस्ट खूप महत्त्वाची आहे. या प्रश्नपत्रिकेची अभ्यासपूर्ण निर्मिती केलेली ...

Popular Posts

ऑनलाईन टेस्ट बाबत आपल्या प्रतिक्रिया वरील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.