लेझीम फिल्म ला "सर्वोत्कृष्ट संगीत" चा राष्ट्रीय पुरस्कार

सलग दुसऱ्यांदा लेझीम शाॅर्टफिल्म राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित

भाजपा चित्रपट कामगार आघाडी व ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन प्रस्तुत.., भगवान एंटरटेनमेंट , बॉलिवूड मँगोज प्रोडक्शन्स...आयोजित, चित्रमहर्षी दादासाहेब फाळके जयंती निमित्त राष्ट्रीय लघुपट महोत्सव - 2018 मध्ये भारतातील एकूण 926 फिल्म मधून लेझीम लघुचित्रपटाला "सर्वोत्कृष्ट संगीत" हा प्रथम पुरस्कार आज शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे देण्यात आला. या शाॅर्टफिल्म चे संगीत क्रिएशन माझे बंधू जयदीप डाकरे सर व मी (प्रविण डाकरे) गेल्या वर्षी संपूर्ण दिवाळी सुट्टी घालवून बनवलेले होते. या मिळालेल्या यशाचे श्रेय लहानपणापासून हार्मोनियम, गायन कलेचे बाळकडू पाजणाऱ्या मी माझ्या वडिलांना देतो.खुप खुप धन्यवाद..


-प्रविण डाकरे (लेझीम शाॅर्टफिल्म - निर्माता व दिग्दर्शक)
-जयदीप डाकरे (लेझीम शाॅर्टफिल्म- संगीत दिग्दर्शक)

Post a Comment

0 Comments

सध्या ब्लॉग डिझाईन चे काम सुरु आहे. लवकरच परिपूर्ण ई-साहित्य उपलब्ध होईल.