Tuesday, January 23, 2018

आनंददायी शिक्षणावरील गीत-लेझीम शाॅर्टफिल्म


गीत लेखन- प्रविण डाकरे

गीत गायन-प्रविण डाकरे, अपूर्वा डाकरे, श्रद्धा & सानिका सिमाल
संगीत - जयदिप & प्रविण डाकरे 

📲📲📲📲📲📲📲📲📲📲📲

आs हाs हाs, आs हाs हाs, आवाज घुमला
आs हाs हाs, आs हाs हाs, नाद कानी दंगला
चला चला रे खेळ मांडुया हलगीच्या ठेक्यात...
आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात,अबबबबब..
आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात //धृ//
मनोरंजनातून शिक्षण देऊ
भिती अन् दडपण पळवून लावू
गोष्टी सांगुया, गाणी म्हणुया, पेटीच्या सुरात...
आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात,अबबबबब..
आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात //1//
पानापानात आहे शब्दांचा खेळ
खेळातून शिक्षण घेऊया छान
आवड लागली, शाळेत जाण्याची, रंगला वर्गात...
आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात,अबबबबब..
आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात //2//
मुलामुलांत आहे कलेची खाण
देऊया प्रेरणा देऊ सन्मान
कला जगण्याची, शिकुया चला, होऊया प्रगत...
आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात,अबबबबब..
आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात //3//

प्रस्तुत गीत Mp3 स्वरूपात डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. 


लेझीम फुल्ल  शाॅर्टफिल्म पहा खालील लिंक वरुन.. 


No comments:

Post a Comment