Wednesday, March 15, 2017

संघर्ष युवा प्रतिष्ठानकडून आज शिवरत्न पुरस्कार प्राप्त

संघर्ष युवा प्रतिष्ठान पाचगणी येथे आज बालगोपाल लेझीम पथक ढाणकेवाडी यांचा लेझीम खेळ होता...मुलांच्या प्रात्यक्षिकांनी शिवभक्तांची मने जिंकली. लहान - लहान मुलं, त्यांचे खेळण्याचे कौशल्य,गायनकला-बालभजनीमंडळ, लेझीम लोककला टिकवण्यासाठी, जि. प.शाळा टिकविण्यासाठी केलेले प्रयत्न व सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभागी झाल्याबद्दल शिवभक्तांनी मला दिलेला शिवरत्न पुरस्कार माझ्यासाठी गोड क्षण होता. त्यांनी बोलविलं, त्यांनी मुलांचे कलागुण पाहिलं, त्यांना आवडलं, त्यांनी तोंडभरून कौतुकही केलं व मुलांसाठी धडपड पाहून शिवरत्न पुरस्कार देऊन काम करण्याचं बळही दिलं...विशेष म्हणजे मुलांचा कार्यक्रम चालू असताना मा.आमदार मानसिंगराव नाईकसो व सांगली जि. प. काँग्रेस पक्ष गटनेते मा.सत्यजित देशमुखसो यांचे आगमन झाले. खुर्चीवर बसलेले असताना उभे राहून त्यांनीही मुलांचे कौतुक केले. संघर्ष युवा प्रतिष्ठान च्या एकतेला सलाम, विविधांगी सामाजिक उपक्रमांना व भावी वाटचालीस शुभेच्छा देतो...
-प्रविण डाकरे प्राथ.शिक्षक ढाणकेवाडी ता.शिराळा जि.सांगलीNo comments:

Post a Comment