कोरोना महामारी मुळे अजूनही शाळा बंद असून अनेक शाळांमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू आहे. शासनाने 1 जुलैपासून 14 ऑगस्टपर्यंत सेतू अभ्यास घेतला होता. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा मागील अभ्यासक्रमावर आधारित उजळणी म्हणून सराव देखील झाला आहे. 15 ऑगस्टपासून नियमित अभ्यासक्रम त्या त्या वर्गाचा शिकवणे सुरू झाले असून प्रथम सत्र मध्ये होणारी संकलित चाचणी अधिक सरावासाठी आम्ही प्रश्नमंजुषा स्वरूपात घेत आहोत.
इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची इयत्तेनुसार आम्ही सर्व विषयांची एकत्रित 100 गुणांची संकलित चाचणी - 1 प्रश्नमंजुषा स्वरूपात घेत आहोत. यामध्ये एकूण 50 प्रश्न असतील. विशेष म्हणजे आम्ही सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणार आहोत.
नवीन शैक्षणिक व्हिडीओंंसाठी खालील गुरुमाऊली चॅॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन ठेवा.
कोण बनेल संकलित टॉपर? प्रश्नमंजुषा
या उपक्रमाचे स्वरूप काय आहे हे जाणून घेऊया खालील मुद्यावरून...
- सदरील प्रश्नमंजुषा कोणत्या इयत्तेसाठी होणार आहे?
"कोण बनेल संकलित टाॅपर?" सदरील प्रश्न मंजूषा ही इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार असून प्रत्येक इयत्तेसाठी वेगळी प्रश्नमंजुषा असेल. प्रत्येक इयत्तेची प्रश्नमंजुषा सोडवण्याची लिंक वेगळी असेल. खालील इयत्तेच्या बटणाला क्लिक करून चाचणी सोडवता येईल.
- प्रत्येक प्रश्नमंजुषा मध्ये एकूण किती प्रश्नांचा समावेश आहे?
प्रत्येक इयत्तेच्या "कोण बनेल संकलित टाॅपर?" प्रश्नमंजुषा मध्ये एकूण 50 प्रश्न समाविष्ट असून प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी आहे. तुम्हाला पन्नास प्रश्न सोडवून चाचणी submit लागेल. शेवटी View Score ला क्लिक करून तुम्हाला किती गुण मिळाले हे देखील समजेल.
- प्रमाणपत्र कोणाला मिळणार आहे?
"कोण बनेल संकलित टाॅपर?" प्रश्नमंजुषा स्वरूपात चाचणी देण्याचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने घटकांचे आकलन होणे हे अपेक्षित आहे. आपण 100 पैकी 100 गुण मिळेपर्यंत देखील सराव करू शकता. जरी नाही मिळाले तरीही आम्ही सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणार आहोत.
इयत्तानिहाय प्रश्नमंजुषा व प्रमाणपत्र लिंक
इयत्ता पहिली | प्रश्नमंजुषा लिंक | कोण बनेल संकलित टाॅपर?
इयत्ता दुसरी | प्रश्नमंजुषा लिंक | कोण बनेल संकलित टाॅपर?
इयत्ता तिसरी | प्रश्नमंजुषा लिंक | कोण बनेल संकलित टाॅपर?
इयत्ता चौथी | प्रश्नमंजुषा लिंक | कोण बनेल संकलित टाॅपर?
इयत्ता पाचवी | प्रश्नमंजुषा लिंक | कोण बनेल संकलित टाॅपर?
इयत्ता सहावी | प्रश्नमंजुषा लिंक | कोण बनेल संकलित टाॅपर?
इयत्ता सातवी | प्रश्नमंजुषा लिंक | कोण बनेल संकलित टाॅपर?
कोण बनेल संकलित टाॅपर? चाचणी घेण्यासाठी मुलांना पोस्ट कशी पाठवाल?
पहिली ते सातवीच्या ग्रुपवर पाठवायच्या पोस्ट खाली दिलेल्या आहेत. खाली दिलेल्या बटणाला क्लिक केल्यावर पोस्ट कॉपी (Copy) होईल. Whatsapp उघडून ग्रुपमध्ये फक्त पेस्ट (Paste) करा.