Saturday, February 1, 2020

प्रेरणा गीत

निष्ठा प्रशिक्षणातील तज्ञ मार्गदर्शकांसाठी लिहिलेलं एक गीतपेठेच्या ज्ञान मंदिरी, दिले निष्ठा प्रशिक्षण..
ज्ञान दिले आम्हाला, आनंदी करू शिक्षण..//ध्रु//

लक्ष्मण गायकवाड सरांनी, सुरांची रंगवली सृष्टी..
आनंद हा जीवनाचा, घेण्या दिली तुम्ही दृष्टी..
जपून ठेवून सर्वांनी, कला हेच जीवन..
ज्ञान दिले आम्हाला, आनंदी करू शिक्षण..//१//

सुहास पाटील सरांनी, गणित सुलभ केले..
कृतीची सांगड घालूनी, खूप आम्हा हसविले..
ज्ञानाची नवी शिदोरी, जपून ठेवू खाण..
ज्ञान दिले आम्हाला, आनंदी करू शिक्षण..//२//

निवास गुरव सरांनी, तंत्रज्ञान रुजविले..
ढोलकीच्या ठेक्यावर, आम्हा त्यांनी डोलविले..
कठीण प्रसंगातूनही, घडवूया जीवन..
ज्ञान दिले आम्हाला, आनंदी करू शिक्षण..//३//

सपना तांबोळी मॅडमनी, बालविश्व रंगविले..
इंग्रजीच्या प्रभावाने, आम्हाला थक्क करविले..
घडवू मातीचा गोळा, जपूया बालमन..
ज्ञान दिले आम्हाला, आनंदी करू शिक्षण..//४//

साक्षी बारटक्के मॅडमनी, भाषा मांडली कलेने..
पर्यावरणाची सांगड, घातली तुम्ही कृतीने..
वैशाली भोई मॅडमनी, शिस्त घडवली मायेनं..
ज्ञान दिले आम्हाला, आनंदी करू शिक्षण..//५//

© 📝 प्रविण दत्तात्रय डाकरे
जि.प.शाळा - कुंडलवाडी ता.वाळवा