Friday, May 5, 2017

उपक्रम - उपयुक्त शैक्षणिक Pdf बनविणे

आम्हालाही इडिटींग येतंय बरं का....

विद्यार्थ्यांसाठी राबविला अनोखा उपक्रम
मुलांनी बनविल्या उपयुक्त शैक्षणिक pdf

परीक्षा संपल्यावर मुले शाळेत येण्यास टाळाटाळ करतात..पण काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम घ्यायचे म्हटल्यावर मुले नियमित शाळेत येऊ लागतात..यापूर्वी लेझीम उपक्रम ही असाच आनंददायी ठरला.परीक्षा संपल्यावर टॅबवर मुलांना connectivity,images डाऊनलोड कशा करायच्या?,Photo Editor व blend collage चा वापर शिकविला . मुलांनी त्यानंतर स्वतःहून नेटवरून संबंधित इमेज डाऊनलोड करुन प्रत्येक इमेजला Photo Editor मध्ये योग्य इफेक्ट देऊन pdf बनविल्या. , Pdf  ला पासवर्ड ही टाकतात. मुलांनी बनविलेल्या pdf files डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. 

रंगवलेली चित्रे

पाळीव प्राणी 

जंगली प्राणी 

फुले 

फळे


व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा - पेठ (सांगली)

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा पेठ जि. सांगली येथे उत्साहात पार पडली . तज्ञ मार्गदर्शक म्हणून मा. भुषण कुलकर्णी सर व टेक्निकल सपोर्ट श्री. एकनाथ कोरे सर यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेची झलक पहा व्हिडिओ स्वरूपात...